Indian Womens Team : हरमनप्रीत, रेणुकाला विश्रांती

smriti

मुंबई : भारतीय महिला संघाच्या आयर्लंडविरुद्धच्या आगामी वन-डे क्रिकेट मालिकेसाठी सोमवारी संघ जाहीर करण्यात आला. भारतीय संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर आणि वेगवान गोलंदाज रेणुका सिंह यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत स्मृती मानधनाकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे, तर दीप्ती शर्मा उपकर्णधार आहे. (Indian Womens Team)

तीन सामन्यांची ही मालिका राजकोट येथे खेळवण्यात येईल. १० जानेवारी, १२ जानेवारी आणि १५ जानेवारी रोजी या मालिकेतील सामने रंगणार आहेत. या मालिकेसाठी राघवी बिश्त आणि सायली सातघरे या नवोदित खेळाडूंना भारतीय वन-डे संघात स्थान देण्यात आले आहे. राघवीने मागील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पण केले होते. सायलीची यापूर्वी ऑक्टोबर, २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठीही संघात निवड करण्यात आली होती. परंतु, त्यावेळी तिला पदार्पणाची संधी मिळाली नाही. (Indian Womens Team)

दरम्यान, शफाली शर्माला या मालिकेकरिता पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवता आलेले नाही. मागील महिन्यात देशांतर्गत महिला वन-डे करंडक स्पर्धेत तिने हरियाणाकडून खेळताना ७ सामन्यांत ५२७ धावा केल्या होत्या. तिच्यासह अरुंधती रेड्डी, राधा यादव आणि स्नेह राणा या अनुभवी खेळाडूही संघाबाहेर आहेत. आर्यलंडचा महिला संघ प्रथमच दुरंगी मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहे. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १२ वन-डे सामने खेळवण्यात आले असून भारताने हे सर्व सामने जिंकले आहेत. (Indian Womens Team)

भारतीय संघ : स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, उमा छेत्री, रिचा घोष, तेजल हसबनीस, राघवी बिश्त, मिनू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तितास साधू, सायमा ठाकोर, सायली सातघरे.

 

हेही वाचा :
रोहित, विराटच निर्णय घेतील
 बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे

Related posts

Vishalgad fort : विशाळगडावरील संचारबंदी उठवली

Pakistan wedding : पाकमध्ये सहा भावांचा सहा बहिणींशी विवाह

Badminton : छत गळतीमुळे प्रणॉयचा सामना थांबवला