India Victory : भारताची विक्रमांसह विजयी आघाडी

बडोदा : हरलीन देओलच्या शतकाच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने मालिकेतील दुसऱ्या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजला ११५ धावांनी हरवले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतानाच काही नव्या विक्रमांवरही नाव कोरले. भारताच्या ५ बाद ३५८ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाचा डाव ४६.२ षटकांमध्ये २४३ धावांत आटोपला. (India Victory)

भारताच्या फलंदाजांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. हरलीनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्यावहिले शतक झळकावताना १०३ चेंडूंमध्ये १६ चौकारांसह ११५ धावांची खेळी केली. सलामी फलंदाज स्मृती मानधना व प्रतिका रावल यांच्यासह मधल्या फळीतील जेमिमा रॉड्रिग्जनेही अर्धशतकी खेळी केल्या. स्मृतीने ४७ चेंडूंमध्ये ७ चौकार, २ षटकारांसह ५३, तर प्रतिकाने ८६ चेंडूंमध्ये १० चौकार, एका षटकारासह ७६ धावा केल्या. जेमिमाने ३६ चेंडूंत ५२ धावा फटकावताना ६ चौकार व एक षटकार लगावला. (India Victory)

विंडीजच्या डावामध्ये कर्णधार हेली मॅथ्यूजचे शतक वगळता अन्य फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. हेलीने १०९ चेंडूंमध्ये १३ चौकारांसह १०६ धावा केल्या. भारतातर्फे प्रिया मिश्राने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. (India Victory)

भारताचे विक्रम

  • भारताने या सामन्यात वन-डे क्रिकेटमधील स्वत:च्या सर्वोच्च धावसंख्येशी बरोबरी केली. यापूर्वी भारताने २०१७ मध्ये आयर्लँडविरुद्ध २ बाद ३५८ धावा केल्या होत्या.
  • भारताने यावर्षी तीनवेळा वन-डेमध्ये ३०० धावांचा टप्पा ओलांडला. एका वर्षामध्ये भारताला प्रथमच अशी कामगिरी करण्यात यश आले. त्याचप्रमाणे, भारताने प्रथमच सलग दोन सामन्यांत ३०० पेक्षा अधिक धावसंख्या उभारली.
  • भारताने या सामन्यात तब्बल ४७ चौकार-षटकारांची (४३ चौकार व ४ षटकार) आतषबाजी केली. आंतराष्ट्रीय महिला वन-डे क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाकडून मारण्यात आलेले हे डावातील सर्वाधिक चौकार षटकार ठरले.
  • या सामन्यात भारताच्या ४ फलंदाजांनी वैयक्तिक ५० धावांचा टप्पा ओलांडला. वन-डेमध्ये भारताला केवळ दुसऱ्यांदा अशी कामगिरी नोंदवता आली.
  • स्मृती मानधनाने या वर्षी १२ वन-डेमध्ये ४ चौकार व ३ षटकारांसह ७४३ धावा केल्या. २०२४ मध्ये सर्वाधिक वन-डे धावा करणाऱ्या महिला फलंदाजांमध्ये ती अग्रस्थानी असून ७०० धावांचा टप्पा ओलांडणारी एकमेव फलंदाज आहे.

हेही वाचा :

बुमराहची सर्वोच्च गुणांशी बरोबरी
अर्जुन तेंडुलकरच्या ५० विकेट पूर्ण

https://www.espncricinfo.com/series/west-indies-women-in-india-2024-25-1459886/india-women-vs-west-indies-women-2nd-odi-1459895/full-scorecard

Related posts

Border-Gavaskar Trophy : रोहित सलामीला; राहुल तिसऱ्या स्थानी

Bumrah : बुमराहची सर्वोच्च गुणांशी बरोबरी

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरच्या ५० विकेट पूर्ण