न्यूझीलंडची ‘दिवाळी’

पुणे : भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने भारताचा ११३ धावांनी पराभव केला. पुणे कसोटीत विजय मिळवण्यासाठी न्यझीलंडने भारताला ३५९ धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २४५ धावांवर आटोपला. यासह न्यूझीलंडने पुणे कसोटीत भारताला ११३ धावांनी पराभूत करून कसोटी मालिका २-० ने जिंकली. यासह न्यूझीलंड संघ पहिल्यांदाच भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. न्यूझीलंडच्या विजयाचा नायक फिरकीपटू मिचेल सँटनर ठरला, त्याने पुणे कसोटीत एकूण १३ विकेट घेतल्या. सँटनरने पहिल्या डावात ७ आणि दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या. (IND vs NZ)

सामन्यात नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने फलंदाजीचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाजांना विकेट घेण्यात यश येत नसल्याचे लक्षात येताच भारताचा कर्णधार रोहित शर्माने चेंडू फिरकीपटूंकडे सोपावला. गोलंदाजीसाठी येताचअश्विने लॅथमला (१५) बाद करत न्यूझीलंडला पहिला झटका दिला. यानंतर सामन्याच्या २४ व्या षटकातं अश्विनने विल यंगच्या रूपात (१८) न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. यानंतर रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागिदारी रचली. सामन्याच्या ४४ व्या षटकात अश्विनने कॉनवेला (७६) बाद करत जोडी फोडली.

सामन्यात रचिन रवींद्र शानदार फलंदाजी करत होता. परंतु, वॉशिंग्टनने रवींद्रला (६५) क्लीन बोल्ड केले. यानंतर सुंदरने टॉम ब्लंडेल (३), डॅरिल मिशेल (१८), ग्लेन फिलिप्स (९), टीम साऊदी (५), एजाज पटेल (४) आणि मिचेल सँटनर (३३) यांना बाद करत न्यूझीलंडचा डाव गुंडाळला. सुंदरने ५९ धावांत सात गडी बाद केले. सुंदरने पहिल्यांदाच कसोटी डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या. तर, पहिल्या डावात आर अश्विनने तीन विकेट घेतल्या. (IND vs NZ)

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा डाव पत्त्यासारखा कोसळला. डावाच्या तिसऱ्याच षटकात टीम साऊदीने रोहित शर्माला (०) बाद केले. यानंतर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल संयमी खेळी केली. सँटनरने गिलला (३०), आणि विराट कोहली (१) तंबूत पाठवले. एका बाजूने विकेट पडत असताना संयमी खेळी करणारा यशस्वी जैस्वाल ग्लेन फिलिस्पचा बळी ठरला. यानंतर पंतला (१८) ग्लेन फिलिप्सने बोल्ड केले.

सँटनरच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका मारताना सर्फराज खान (११) झेलबाद झाला. यानंतर अश्विन बाद झाला.रवींद्र जडेजाने (३८) संघर्ष केला. परंतु, तोही सँटनरचा बळी ठरला. आकाश दीप (६) आणि बुमराह (०) हेही सॅन्टनरचे बळी ठरले. वॉशिंग्टन सुंदर १८ धावांवर नाबाद राहिला. भारताचा पहिला डाव १५६ धावांवर आटोपला. गोलंदाजीत फिरकीपटू सँटनरने ५३ धावांत ७ बळी घेतले. त्याच्यासह ग्लेन फिलिस्पने २ तर, साऊथीने १ विकेट घेतली. (IND vs NZ)

दुसऱ्या डावात न्यूझीलंडला पहिला धक्का डेव्हन कॉनवेच्या (१७) रूपाने बसला. त्याला वॉशिंग्टनने बाद केले. यानंतरने अश्विनने विल यंगला (२३) बाद केले. त्यानंतर सुंदरने रचिन रवींद्रला (९) आणि डॅरिल मिशेल (१८) यांना बाद केले. यानंतर कर्णधार लॅथम आणि टॉम ब्लंडेल यांनी पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. टॉम लॅथमला (८६) एलबीडब्ल्यू आऊट करून सुंदरने ही भागीदारी संपवली.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने ५ बाद १९८ धावांवरून डावाला सुरुवात केली. जडेजाने टॉम ब्लंडेलला (४१) क्लीन बोल्ड केले. यानंतर जडेजाच्या चेंडूवर लाँग शॉट मारण्याच्या प्रयत्नात मिचेल सँटनर (४) बाद झाला. यानंतर टीम साऊदी आणि एजाज पटेल थोड्या अंतराने अश्विन आणि जडेजाचे बळी ठरले. यानंतर सुंदरने ओरूर्कला बाद करत न्यूझीलंडचा डाव गुंडाळला. ग्लेन फिलिप्स (४८) नाबाद राहिला. पुणे कसोटीत विजय मिळवण्यासाठी भारतापुढे ३५९ धावांचे लक्ष्य होते. सामन्याच्या सुरूवातीलाच रोहित शर्माने अपयशी ठरला. मिशेल सँटनरच्या गोलंदाजीवर केवळ ८ धावा करून बाद झाला. यानंतर सँटनरने गिलला (२३) बाद केले. (IND vs NZ)

दुसऱ्या डावात जैस्वालने ४१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे न्यूझीलंडविरुद्ध भारतीयाने केलेले सर्वात जलद अर्धशतक ठरले. परंत, सँटनरने त्याला ७७ धावांवर बाद केले. यानंतर पंत (०) धावबाद झाला. कोहलीकडून (१७) मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तोही सँटनरच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. यानंतर सँटनरने सरफराज खानला (९) क्लीन बोल्ड केले. भारताची सातवी विकेट वॉशिंग्टन सुंदरच्या (२१) रूपाने बाद झाली. त्याला ग्लेन फिलिप्सने बाद केले. यानंतर जडेजा आणि अश्विनने भारतीय डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र अश्विन (१८) मिचेल सँटनरचा बळी ठरला. यानंतर एजाज पटेलने आकाश दीपला बाद करून भारताला नववा धक्का दिला. त्यानंतर इजाझने रवींद्र जडेजाला (४२ धावा) बाद करून भारतीय डाव गुंडाळला.

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत