इम्रान खान यांची रवानगी अंधार कोठडीत

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची रवानगी कारागृहातील अंधार कोठडीत करण्यात आली आहे. त्यांना आठवड्यातून एकदा आपल्या मुलांशी बोलण्याची परवानगीही नाकारण्यात आली आहे, असा दावा इम्रान खान यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी केला आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) बैठक सुरू असताना त्यांनी केलेले आरोप चर्चेचा विषय ठरले आहेत.

इम्रान खान यांच्‍या सुरक्षेबाबत चिंता

इम्रान खान यांच्‍या पूर्वाश्रमीच्‍या पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी शेहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर काही गंभीर आरोप केले आहेत. त्‍यांनी सोशल मीडियावर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, आम्‍हाला माहिती मिळाली आहे की, इम्रानला एका अंधाऱ्या कोठडीत एकटे ठेवले आहे. तेथे वीज नाही. त्‍यांना आता आपल्या मुलांना आठवड्यातून एकदा फोनवर बोलण्‍याचीही परवानगी नाही. न्‍यायालयाची परवानगी असतानाही त्‍याचे लंडनमधील मुले सुलेमान आणि कासिम खान यांच्याशी फोनवर सुरु असणारा संवाद तोडण्यात आला होता. तसेच अंधार कोठडीत बाहेर जाण्‍याचीही इम्रान खान यांना परवानगी नाही. इम्रानचा बाहेरच्या जगाशी संपर्क नाही, त्याच्या वकिलांना त्याच्या सुरक्षेची चिंता आहे.

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले