बॉक्सर इमाने खलिफ ‘पुरूषच’

वृत्तसंस्था : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अल्जेरियाची बॉक्सर इमाने खलीफने सुवर्ण पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली होती. इमानेने ६६ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात चीनच्या यांगला पराभूत केले होते. त्यावेळी  स्पर्धेदरम्यान इमानेवरून मोठा वाद झाला होता. आता  एका वैद्यकीय अहवालातून इमाने खलीफ महिला नसून पुरुष असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवालामध्ये इमाने खलीफच्या शरीरात XY गुणसूत्र असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ऑलिम्पिकच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. (Imane Khelif)

अल्जेरियाच्या इमाने खलीफ आणि तैवानच्या लिन यू-टिंग स्त्री त्वाच्या चाचणीत अपयशी ठरल्याने त्यांना गेल्या वर्षीच्या जागतिक स्पर्धेत अपात्र ठरवण्यात आले होते.  असे असतानाही आयओसीने इमाने खलीफला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती.

इमाने खलीफने ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या शरीरयष्टीचा वापर केला होता. अंतिम सामन्यात इमाने खलीफने यांग लिऊचा ५-० असा पराभव केला होता. याआधी इमाने खलीफने स्पर्धेतील सामन्यांत एकतर्फी विजय मिळवला होता. स्पर्धेदरम्यान  इमाने खलीफ महिला खेळाडू आहे की पुरुष? असा  मोठा वाद झाला होता. यावेळी एका बायोलॉजिकल पुरुष बॉक्सरचा सामना महिलेशी केल्याचा आरोप करण्यात आला होता. (Imane Khelif)

इमानेवर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेची बंदी

इमाने खलिफ अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. यापूर्वी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएनने गेल्या वर्षी इमाने खलीफवर बंदी घातली होती. यासह दिल्लीतील बॉक्सिंग असोसिएशनने इमानेला जागतिक अजिंक्यपद सुवर्णपदकाच्या सामन्यात सहभागी होण्यास बंदी घातली होती.

मी इतर महिलांप्रमाणेच

यावर बोलताना इमाने म्हणाली की,  मी इतर महिलांप्रमाणेच आहे. मी स्त्री म्हणून जन्माला आले, मी स्त्रीप्रमाणे जगते. पण काही लोक माझ्या यशाचे शत्रू आहेत आणि ते माझे यश पचवू शकत नाहीत.

हेही वाचा :

Related posts

Mohammed Shami : शमीचा समावेश अद्याप दूरच

Tanush Kotian : तनुष कोटियनला ऑस्ट्रेलियाचे तिकीट?

Vinod Kambli : विनोद कांबळीची प्रकृती खालावली