ICC Cricketer : बुमराह ‘क्रिकेटर ऑफ दि इयर’

ICC Cricketer

bumrah

दुबई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दोन दिवसांत दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूला दिल्या जाणाऱ्या सर गारफिल्ड सोबर्स अवॉर्डसाठी २०२४ या वर्षाकरिता बुमराहची निवड करण्यात आली आहे. महिला क्रिकेटमध्ये न्यूझीलंडची मिली केर ही सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरली आहे. (ICC Cricketer)

सोमवारीच (२८ जानेवारी) आयसीसीने बुमराहची २०२४ या वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटीपटू म्हणून निवड केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुमराहला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. बुमराहने २०२४ मध्ये कसोटी व टी-२० क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारे त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बुमराहने २०२४ या वर्षभरात कसोटीमध्ये ७१ आणि टी-२०मध्ये १५ अशा एकूण ८६ विकेट घेतल्या. त्याचबरोबर त्याच्या नावावर ९७ धावा आणि ८ झेलही जमा आहेत. (ICC Cricketer)

बुमराहसोबत २०२४ च्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूसाठी इंग्लंडचे जो रूट व हॅरी ब्रुक, तसेच ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड यांना नामांकन होते. सर गारफिल्ड सोबर्स पुरस्काराचा मानकरी ठरणारा बुमराह हा भारताचा पाचवा क्रिकेटपटू आहे. यापूर्वी, भारताच्या राहुल द्रविड (२००४), सचिन तेंडुलकर (२०१०), रविचंद्रन अश्विन (२०१६), विराट कोहली (२०१७, २०१८) यांना हा पुरस्कार मिळाला आहे. (ICC Cricketer)

महिला क्रिकेटमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूसाठी दिले जाणाऱ्या ‘रिचेल हेहो फ्लिंट’ या पुरस्कारासाठी मिली केरची निवड करण्यात आली. या वर्षी न्यूझीलंडने प्रथम महिला टी-२० वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावण्यामध्ये केरचा महत्त्वाचा सहभाग होता. २४ वर्षीय केरने २०२४मध्ये वन-डे व टी-२०मध्ये मिळून एकूण ४३ विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर तिने या दोन्ही प्रकारांत मिळून ६५१ धावा फटकावल्या असून १४ झेलही घेतले आहेत. तिचाही यावर्षीचा हा दुसरा आयसीसी पुरस्कार आहे. काही दिवसांपूर्वीच तिची २०२४ मधील सर्वोत्कृष्ट महिला टी-२० खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. (ICC Cricketer)

हेही वाचा :

विराट कोहलीचा दिल्ली संघासोबत सराव

भारत उपांत्य फेरीत

ज्योती याराजीचे विक्रमासह सुवर्ण

Related posts

Dhoni

Dhoni : पुढच्यावेळी योग्य संघबांधणी महत्त्वाची

BCCI Contracts

BCCI Contracts : श्रेयस, ईशानची वापसी

RCB beats PK

RCB beats PK : बेंगळरूची पंजाबला परतफेड