ICC condemns US sanctions : अमेरिकेच्या निर्बंधांचा ‘आयसीसी’कडून निषेध

ICC condemns US sanctions

ICC condemns US sanctions

हेग/वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयसीसी कर्मचाऱ्यांवर निर्बंध लादण्याच्या आदेशाचा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (आयसीसी) निषेध केला आहे. आपले न्यायदानाचे काम सुरूच ठेवण्याचे अभिवचनही दिले आहे.(ICC condemns US sanctions)

‘आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.’ ट्रम्प प्रशसनाचा आदेश त्यांच्या ‘स्वतंत्र आणि निःपक्षपाती’ कार्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करते, असे आयसीसीने म्हटले आहे.

गाझामधील कथित युद्ध गुन्ह्यांबद्दल आयसीसीने नेतन्याहूसाठी अटक वॉरंट जारी केले. इस्रायलने त्याचा इन्कार केला आहे. ट्रम्प प्रशासनानेही ही कृती ‘बेकायदेशीर आणि निराधार’ असल्याचा आरोप केला. आयसीसीने हमास कमांडरसाठीही वॉरंट जारी केले आहे.

आयसीसी हे जागतिक न्यायालय आहे. अमेरिका आणि इस्रायल हे त्याचे सदस्य नसले तरी नरसंहार, मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि युद्ध गुन्ह्यांसाठी खटला चालवण्याचा या न्यायालयाला अधिकार आहे.(ICC condemns US sanctions)

आपल्या निवेदनात आयसीसीने म्हटले आहे : ‘आपल्या अधिकाऱ्यांवर निर्बंध लादण्याचा आणि त्याच्या स्वतंत्र आणि निःपक्षपाती न्यायिक कार्यास हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेच्या कार्यकारी आदेशाचा निषेध करते.’

‘न्यायालय आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जगभरातील अत्याचारांना बळी पडलेल्या लाखो निरपराधांना कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवून देण्याचे वचन देत आहे,’ असे त्यात म्हटले आहे. (ICC condemns US sanctions)

अलिकडच्या काळात, युक्रेनमधील कथित युद्ध गुन्ह्यांबद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, अफगाण मुली आणि महिलांचा छळ केल्याबद्दल तालिबान नेते तसेच रोहिंग्या मुस्लिमांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी म्यानमारच्या लष्करी नेत्यांवर आयसीसीने अटक वॉरंट जारी केली आहेत.

अमेरिका आणि इस्रायल हे या न्यायालयाचे सदस्य नाहीत, परंतु यूके आणि अनेक युरोपीय राष्ट्रांसह १२० हून अधिक देश त्याचे सदस्य आहेत.

न्यायालयातील न्यायाधीशांनी सांगितले की नेतन्याहू, त्यांचे माजी संरक्षण मंत्री योव गॅलंट आणि हमासचे मोहम्मद डेफ यांच्यावर ‘कथित युद्ध गुन्ह्यांची आणि मानवतेविरुद्धच्या गुन्हे दाखल करण्याची ‘वाजवी कारणे’ आहेत. (ICC condemns US sanctions)

गेल्या वर्षी इस्रायली हवाई हल्ल्यात डेफचा मृत्यू झाल्याचे हमासने म्हटले आहे. ट्रम्पच्या आदेशावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेन यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे की आयसीसीने ‘जागतिक दंडुकेशाहीविरूद्ध लढा मुक्तपणे सुरू ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.’

युरोप नेहमीच न्याय आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या बाजूने उभे राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

भारतीयांची अमेरिकेतून हद्दपारी आणि नेतृत्वहीन जग

चाळीस तास बेड्या घातलेल्या अवस्थेत

Related posts

32 burglaries solved

32 burglaries solved : तीन चोरट्यांकडून ३२ घरफोड्या

Eknath shinde’s assistance

Eknath shinde’s assistance: काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला पाच लाखाची मदत

Rahul Gandhi visit

Rahul Gandhi visit: दहशतवादाविरुद्ध एकजूट असणे महत्त्वाचे