Husband’s Victim : पत्नीला तो करायला लावी…

Husband's Victim

बुलंदशहर : (उत्तर प्रदेश) : पैशासाठी पत्नीला मित्रासोबत शय्यासोबत करायला लावणाऱ्या पतीची काळे कर्तृत्व बाहेर आली आहेत. मित्रासोबत शय्यासोबत करताना तो व्हिडिओ काढत होता. पत्नीने नकार दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही देत होता. पतीच्या कृत्याला कंटाळून अखेर पत्नीने पोलिसांत पतीविरोधात तक्रार दिली. (Husband’s Victim)

पीडितेचा पती सौदी अरेबियात राहतो. वर्षातून तो एकदोनदा घरी येतो. त्यांना चार मुले आहेत. एक दिवस ती महिला घरी असताना शेजारचा एक युवक तिच्या घरात घुसला आणि तिच्यावर बलात्कार केला. संबधित महिलेने संबधित युवकाची तक्रार पतीकडे केली असता तो माझा मित्र असून तो जो करेल ते त्याला करु दे. तो मला पैसे देतो, असे त्याने निर्लज्जपणे सांगितले. काही दिवसांनी पती स्वत:च एका युवकाला घेऊन आला. त्याच्यासोबतही त्याने शय्यासोबत करायला सांगितले.(Husband’s Victim)

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या लग्नाला १४ वर्षे झाली आहेत. चार मुले आहेत. पती आपल्या मित्रांना घेऊन घरी आला. त्याने बलात्काराचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर त्याने मित्रासोबत शय्यासोबत करण्यास नकार दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. शय्यासोबत करणाऱ्या मित्रांकडून तो मोठी रक्कम घेत असे. मी सासरच्या लोकांकडे तक्रार केली. नणंदेलाही सांगितले, पण तिनेही पती सांगतोय ते कर असे सांगितले.(Husband’s Victim)

पिडिताने सांगितले की, एक दिवस पती आपल्या मित्रांना घेऊन आला. त्यांच्यासोबत शय्यासोबत करायला सांगितले. तसा व्हिडिओ काढणार असल्याचे सांगितले. मी ठाम नकार दिला. त्यावर त्याने यापूर्वी काढलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने मारहाण केली. घटस्फोट देण्याची धमकी दिली. माहेरच्या नातेवाईकांनी ही गोष्ट सांगू शकत नाही. मी गरीब, असहाय्य आहे. घटस्फोट दिल्यास जाणार कुठे?

या संदर्भात बुलंदशहाराचे एएसपी ऋजुल यांनी सांगितले की एका पोलिस ठाण्यात एका महिलेने तक्रार केली आहे. आम्ही चौकशी करत आहोत. पीडितेने मुख्यमंत्री योगी, उपमुख्यमंत्री आणि एसएसपींनाही निवेदन दिले आहे.

हेही वाचा :

पाच मिनिटे श्वासही घेता येत नव्हता!

विष पिऊन आंदोलक शेतकऱ्याची आत्महत्या

Related posts

Dewas Crime : नऊ महिने फ्रीजमध्ये होता मृतदेह

convocation : शिवाजी विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा शुक्रवारी

Children’s Drama : बालनाट्य स्पर्धा १३ जानेवारीपासून