human barbie: तारुण्य टिकवण्यासाठी तिने मुलाचे…

न्यू यॉर्क : कमी वयाच्या रक्तदात्याकडून विशेषतः स्वतःच्या मुलाकडून रक्त घेण्याचे अनेक फायदे असतात, असे तिला वाटते. त्यामुळे स्वत:चे तारुण्य टिकवण्यासाठी तिने स्वत:च्या मुलाचे रक्त घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे तिच्या या सौंदर्य उपचारासाठी मुलानेही आनंदाने संमती दिल्याचे ती सांगते. त्याला आजीसाठीही रक्त द्यायची इच्छा आहे. (human barbie)

लॉस एंजेलिसमधील मार्सेला इग्लेसिया या ४७ वर्षीय महिलेने ही माहिती न्यूयॉर्क पोस्टला दिलीय. ती स्वत:ला ‘ह्युमन बार्बी’समजते. ‘कमी वयाच्या विशेषत: तरुण मुलाच्या माध्यमातून रक्त संक्रमण केले तर पेशी तरूण राहतात. त्यातही स्वत:च्या मुलाकडून किंवा मुलीकडून रक्तसंक्रमण करून घेतले तर त्याचा चांगला फायदा होतो. आण सध्याचे युग तरुण आण ताजेतवाने दिसण्याचे आहे,’ असे ती सांगते. ती स्वत:ला ‘ह्युमन बार्बी’ मानते. स्टेम सेल थेरपी करून घेण्याचा प्रयत्न तिने केला. तेव्हा ही बाब समजल्याचे ती सांगते. म्हणूनच मी आता मुलाचे रक्त घेणार असल्याचे ती सांगते.(human barbie)

प्रक्रिया कशी काम करते?

इग्लेसियाने केलेल्या दाव्यानुसार, ‘रक्त संक्रमणामुळे तुमच्या शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी ताज्या लाल रक्तपेशी येतात. तसेच  ​​प्लाझ्मामध्ये प्रथिने आणि गोठण्याचे घटक असतात. त्यामुळे रक्तस्त्राव थांबवण्यास किंवा तब्बेत ठणठणीत राहण्यास मदत होते.’ तथापि, तरुण व्यक्तीकडून रक्त संक्रमण करवून घेतल्यामुळे तारूण्य टिकते, याबद्दलचे खूपच मर्यादित क्लिनिकल पुरावे आहेत.

हा प्रकार धोकादायक आहे का?

अन्न आणि औषध प्रशासनाने प्लाझा घेण्याबाबत इशारा दिला आहे. त्यातही तरूण दात्याकडून प्लाझा घेण्याच्या प्रक्रियेत धोके संभवू शकतात, असे एफडीएने २०१९ मध्ये स्पष्ट केले आहे.

सामान्य वृद्धत्व, स्मरणशक्ती कमी होणे ते स्मृतिभ्रंश, पार्किन्सन्स, मल्टिपल स्क्लेरोसिस, अल्झायमर, हृदयविकार किंवा पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर यांसारख्या गंभीर आजारही उद्भवू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. तरूण दात्याकडून प्लाझ्मा घेण्यामुळे वृद्धत्व कमी होण्याचे किंवा तरुण दिसण्याचे कोणतेही वैद्यकीय पुरावे नसल्याचेही एफडीएने स्पष्ट केले आहे.(human barbie)

मार्सेला मात्र सध्या लॉस एंजेलिसमध्ये सौंदर्यविषयक असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या शोधात आहे.

तारुण्यासाठी खटाटोप

न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार, मार्सेलाने वृद्धत्वावर मात करण्यासाठी विविध कॉस्मेटिक प्रक्रियेवर $९९,०००डॉलरवर खर्च केला आहे. आता ती तिच्या २३ वर्षीय मुलगा रॉड्रिगोकडून रक्त घेणार आहे. तारुण्य टिकवण्यासाठी ती एक कठोर पथ्ये पाळते. दररोज एक तास व्यायाम आणि आठ तास झोप मिळेल, याची काळजी घेतले. ती साखरयुक्त पेये, सोया उत्पादने किंवा अल्कोहोलही घेत नाही. मटणाऐवजी केवळ मासे खाते.

हेही वाचा :
 खून केला नि मृतदेहाचे तुकडे बॅरेलमध्ये भरले

Related posts

Gautam Gambhir: रोहित, विराटच निर्णय घेतील

Australia Win : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे

AI Workshop:‘एआय’चा वापर माध्यमांत कसा कराल