HMPV Patients :‘एचएमपीव्ही’ किती घातक?

HMPV Patients

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना व्हायरससारखा आणखी एक एचएमपीव्ही व्हायरस वेगाने पसरत आहे. व्हायरसचे दोन रुग्ण बेंगळूरमध्ये आढळले आहेत. विषाणू घातक नसला तरी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. गुजरातमध्येही एक रुग्ण आढळला आहे. (HMPV Patients)

बेंगळुरूमध्ये एका आठ महिन्याच्या बाळाला ह्यूमन मेटान्युमो व्हायरस (एचएमपीव्ही) झाल्याची पहिली केस आढळली. त्याचे सॅम्पल दोन जानेवारीला तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आणखी एका लहान बाळालाही बाधा झाली आहे. या बाळाच्या परिवारातील कुणीही बाहेर प्रवास केला नव्हता, असे बेंगळुरू महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले. तसेच या दोघांत चिंताजनक लक्षणेही आढळून आलेली नाहीत.(HMPV Patients)

हा विषाणू घातक नाही, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. मात्र काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे. चीनमध्ये गेल्या आठवड्यात एचएमपीव्ही रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामध्ये लहान मुले आणि वृध्दांना या विषाणूची बाधा झाली आहे. थंडीच्या महिन्यात या श्वसनासंबंधी असलेल्या विषाणूचा प्रसार जोरात होतो. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सोशल मडियावर मिळाली माहिती

एचएमपीवीचा प्रसार वेगाने सुरू झाल्याची सर्वप्रथम माहिती सोशल मिडियावर मिळाली. चीनमधील हॉस्पिटलमध्ये या व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून आले आहेत. एचएमपीव्ही, इन्फ्लुएंजा ए, माइकोप्लाज्मा न्यूमोनिया आणि कोविड १९ सहत अनेक विषाणूचा बाधा झालेल्या रुग्णांची संख्या हॉस्पिटलमध्ये दिसून आली आहे.

एचएमपीव्ही म्हणजे काय?

अमेरिकन लंग असोसिएशननुसार, एचएमपीव्हीचा विषाणू सर्वप्रथम २००१ मध्ये पहिल्यांदा नेदरलँडमध्ये शोधला गेला. तो कोरोनाच्या विषाणूप्रमाणे आहे. तो श्वसन प्रकियेत व्यत्यय आणतो. कोरोना विषाणूप्रमाणे त्याचा प्रसार होतो.

प्रसार कसा होतो?

या विषाणूचा प्रसार संक्रमित व्यक्तीच्या माध्यमातून होतो. खोकला आणि शिंकण्यामुळे त्याचे विषाणू बाहेर पडतात. या विषाणूने बाधित झालेली व्यक्तीचा संपर्कात आलेल्या वस्तूंतूनही  प्रसार होतो. गर्दीच्या ठिकाणी हा विषाणू अतिवेगाने पसरतो.

एचएमपीव्हीची लक्षणे?

एचएमपीव्ही झालेल्या व्यक्तीला खोकला आणि सर्दीची लक्षणे दिसून येतात. नाक वाहणे किंवा बंद होते, घशात खवखव वाढते. काही व्यक्तींच्या घशात घरघर वाढते,  श्वास घेताना त्रास होतो.

Related posts

Vishalgad fort : विशाळगडावरील संचारबंदी उठवली

Pakistan wedding : पाकमध्ये सहा भावांचा सहा बहिणींशी विवाह

एकाच नंबरच्या दोन गाड्या… नेमके गूढ काय..?