Helicopter crash: कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा मृत्यू

Helicopter crash

पोरबंदर : गुजरातमधील पोरबंदर येथे इंडियन कोस्ट गार्डचे एक अडवान्सड् लाईट हॅलिकॉप्टर ध्रुव कोसळले. त्यामध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. या घटनेने आणखी काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू झाला आहे. (Helicopter crash)

इंडियन कोस्ट गार्ड देशातील समुद्र किनारे आणि समुद्राच्या हद्दीवर नजर ठेवण्याचे काम करते. भारतीय तटरक्षक दलाच्या माहितीनुसार रविवारी ध्रुव हेलिकॉप्टरचा अपघात झाला. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार ध्रुव हॅलिकॉप्टर खुल्या मैदानात कोसळले आणि हेलिकॉप्टरला आग लागली. हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि तीन व्यक्ती प्रवास करत होता. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत. दोन महिन्यांपूर्वीही तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले होते.

Related posts

Pune accident : बापासह दोन मुलांना ट्रकने चिरडले

Online Fraud: जबाबदारी बँकांचीच!

Emergency Landing: विमान उंचीवर असतानाच लागली आग