Gold deposits discovered: चीनमध्ये सापडले इतके सोने!

Gold deposits discovered

बीजिंग : चीनच्या अर्थव्यवस्थेला गती देणारी एक बातमी पुढे आली आहे. तेथे सोन्याचे दोन मोठे सापडले आहेत. प्रगत तंत्रज्ञानाच्याआधारे शोध लावल्यास तेथे आणखी साठे सापडू शकतील, असा दावा करण्यात येत आहे. त्यातही ते जगातील सर्वांत मोठ्या साठ्यांपैकी एक असू शकतात. विशेषत: दक्षिण आफ्रिकेतील सर्वांत मोठ्या साठ्यालाही मागे टाकू शकतात.(Gold deposits discovered)

चीनमध्ये या दोन मोठ्या साठ्यांचा शोध लागल्याने चीनला सोन्याच्या उत्पादनाची गती कायम ठेवण्याबरोबरच त्याच्या उत्पादनातील घट रोखण्यास मदत होऊ शकते.

शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, त्यांनी मध्य आणि ईशान्य चीनमध्ये १,००० टन सोन्याचे दोन विक्रमी सोन्याचे साठे शोधले आहेत. प्रगत शोध तंत्रज्ञानाचा वापर करून आणखी शोध लागू शकतात. (Gold deposits discovered)

जर हे साठे सोन्याचेच आहेत असे सिद्ध झाले तर ते जगातील सर्वांत मोठ्या सोन्याच्या साठ्यांपैकी एक असू शकतात. त्यातही दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या ज्ञात सोन्याच्या साठ्यालाही मागे टाकू शकतात.

चायना गोल्ड असोसिएशनच्या मते, चीन हा जगातील सर्वात मोठा सोने धातू उत्पादक देश आहे. गेल्या वर्षी त्याचे उत्पादन ३७७ टन होते. सोन्याच्या उत्पादनात चीन अव्वल स्थानावर आहे, परंतु सिद्ध झालेल्या सोन्याच्या खाणींच्या साठ्यात तो दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि रशियासारख्या देशांपेक्षा मागे आहे.

सोने हे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासह चलनांचा कमकुवतपणा रोखण्याचे महत्त्वाचे साधन आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि अगदी एरोस्पेस घटकांच्या विकासातही ते महत्त्वाची भूमिका बजावते. (Gold deposits discovered)

काही तज्ञांनी याबद्दल शंका व्यक्त केली आहे, तथापि दोन मोठ्या साठ्यांचा शोध चीनला सोन्याच्या उत्पादनाची गती राखण्यास आणि उत्पादनातील घट रोखण्यास मदत करू शकतो.

या साठ्यांपैकी मध्य चीनमध्ये पहिल्या साठ्याचा शोध नोव्हेंबरमध्ये लागला. त्याला व्यापक प्रसिद्धी मिळाली. हुनान प्रांताच्या भूगर्भीय संशोधन विभागाने १,००० टनांपेक्षा जास्त सोने असलेला एक अति-मोठा सोन्याचा साठा सापडल्याचे जाहीर केले होते. त्याची किंमत ६०० अब्ज युआन (८३ अब्ज डॉलर्स) पेक्षा जास्त असू शकते.

या विभागाच्या एका सदस्याने चिनी राष्ट्रीय माध्यमांना सांगितले की हा शोध ३डी भूगर्भीय पाहणीसारख्या नवीन शोध तंत्रज्ञानामुळे शक्य झाला आहे.

त्याच वेळी ईशान्येकडील लिओनिंग प्रांतातही आणखी एक मोठा सापडला. (Gold deposits discovered)

हुनान सोन्याच्या साठ्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लिओनिंगमधील दादोंगगौ सोन्याच्या प्रचंड साठ्याबद्दलचा एक पेपर चायना मायनिंग मॅगझिनला सादर करण्यात आला. तो जानेवारीमध्ये एका जर्नलमध्ये प्रकाशित झाला. पूर्वेकडून पश्चिमेकडे ३,००० मीटर (९,८०० फूट) पेक्षा जास्त आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे २,५०० मीटरपेक्षा जास्त पसरलेला हा साठा उत्तर चीन क्रॅटनमध्ये आहे. तो पृथ्वीच्या कवचातील जगातील सर्वात जुन्या स्थिर भागांपैकी एक आहे.

हेही वाचा :
६० तासांनी ढिगाऱ्याखालून चौघे जिवंत सापडले
रेड क्रॉसचे आठ वैद्यकीय कर्मचारी हल्ल्यात ठार

Related posts

US-China trade war: चीनची ताठर भूमिका कायम

Weather Forecast: कोल्हापूर, सांगलीला पावसाचा इशारा

Crop insurance : कॉर्पोरेट पीक विमा कंपन्या : “आओ जाओ घर तुम्हारा” ?