महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा, असा प्रस्ताव पाठवला आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. रतन टाटा याना जो पहिला उद्योग रत्न पुरस्कार देण्यात आला होता. तो यापुढे रतन टाटा यांच्या नावाने देण्यात येईल, असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय मुंबई इथं उद्योग भवन उभारलं जात असून त्याला रतन टाटा यांचं नाव देण्यात येणार आहे. ठाणे रत्नागिरी आदी कामासाठी सीएसआर मधून ५०० कोटी रुपये रतन टाटा यांनी दिले होते. नवीन उद्योग भवन हे ७०० कोटींचे होत आहे याला नाव देऊन एक प्रकारे शासकीय श्रध्दांजली असेल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. (Ratan Tata)
नवल आणि सूनू टाटा यांच्या पोटी २८ डिसेंबर १९३७ रोजी रतन टाटा यांचा जन्म झाला. रतन टाटा यांचे शालेय शिक्षण मुंबईतच कॅम्पियन, तसेच कॅथेड्रल आणि जॉन कॉनन येथे झाले. नंतर ते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात गेले. तिथे त्यांनी आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले. १९५५ ते १९६२ हा अमेरिकेतील वास्तव्याचा काळ रतन टाटा यांच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकणारा ठरला. प्रचंड प्रवास करून त्यांनी अमेरिका पाहिली. तेथील जीवनशैलीच्या प्रभावामुळे त्यांनी लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक होण्याचे ठरवले. दरम्यान लेडी नवाजबाई यांची प्रकृती बिघडल्याची बातमी आली आणि त्यांना भारतात परतावे लागले. भारतात परत आल्यावर रतन टाटा यांना आयबीएम कंपनीकडून नोकरीची ऑफर आली होती. परंतु जेआरडी टाटा यांनी त्यांना आयबीएम कंपनीत काम न करता टाटा समूहातूनच कामाची सुरुवात करण्यास सांगितले. त्यानुसार १९६२ मध्ये त्यांनी टाटा इंडस्ट्रीजमधून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. पुढे १९७५ मध्ये त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रगत व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केला.
प्रेरणादायी प्रवास
रतन टाटा यांनी १९६२ मध्ये टाटा ग्रूप जॉईन केल्यानंतर पुढच्याच वर्षी ते टाटा आयर्न अँड स्टील कंपनीमध्ये (सध्याची टाटा स्टील) जमशेदपूर येथे प्रशिक्षण कार्यक्रमासाठी दाखल झाले. १९६५ मध्ये टिस्को कंपनीच्या इंजिनिअरिंग विभागात टेक्निकल ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९६९ मध्ये त्यांनी टाटा ग्रूपचे निवासी प्रतिनिधी हणून ऑस्ट्रेलियामध्ये काम केले. तिथून भारतात परतल्यानंतर ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये दाखल झाले. १९७१ मध्ये नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स (नेल्को) मध्ये त्यांच्यावर संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. १९७४ मध्ये ते टाटा सन्समध्ये संचालक बनले. १९८१ मध्ये त्यांची टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९८६ ते १९८९ या काळात एअर इंडियाचे चेअरमन म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. २५ मार्च १९९१ रोजी त्यांनी जेआरडी टाटा यांच्याकडून टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. दरम्यान भारतात खुले आर्थिक धोरण आले आणि याच काळात त्यांनी टाटा ग्रूपच्या पुनर्रचनेचे काम सुरू केले. आठ-नऊ वर्षात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले होते, याच काळात रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा ग्रूपने अनेक शिखरे पादाक्रांत केली. टेटली, कोरस, जग्वार लँड रोव्हर, ब्रुनर मोंड, जनरल केमिकल इंडस्ट्रिअल प्रॉडक्ट्स आण देवू अशा जगभरातील नामवंत कंपन्या टाटा ग्रूपचा भाग बनल्या होत्या. २००८ साली ग्राहकांच्या सेवेत दाखल झालेली नॅनो गाडी हा रतन टाटा यांच्या कारकीर्दीतील उत्कर्षबिंदू होता. रतन टाटा यांचा प्रवास तपशीलवार मांडण्याचे कारण म्हणजे देशाच्या उद्योगविश्वात क्रांती घडवणा-या उद्योगपतीचा प्रवास नेमका कसा झाला आहे, याची कल्पना यावी. नुसते टाटा कुटुंबात जन्माला आल्यामुळे ते या स्थानाला पोहोचले असे नाही, तर त्यासाठी त्यांनी विविध टप्प्यांवर खडतर परिश्रम घेतले. (Ratan Tata)
हॉटेलमध्ये भांडी घासली
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्ट होण्याचे स्वप्न बाळगून रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले. आपले टाटा कुटुंबातील आहोत, हे विसरून स्वतःच्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी केला. अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या वास्तव्यामध्ये त्यांनी हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व प्रकारची कामे केली.
अपयशातून यशाकडे झेप
रतन टाटा १९६२ च्या डिसेंबर महिन्यामध्ये टाटा समूहात दाखल झाले; मात्र समूहाच्या परंपरेनुसार ६२ ते ७१ त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच १९७१ मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली. नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती. रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळविले. संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा दोन टक्क्यांवरून वीस टक्के झाला; पण देशात आणीबाणी जाहीर झाली. पाठोपाठ आलेल्या मंदीमध्ये नेल्कोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली. रतन टाटा यांच्या वाट्याला आलेले हे पहिले अपयश. १९७७ मध्ये रतन टाटांवर एम्प्रेस मिल या टाटा समूहातील बंद पडावयास आलेल्या मिलची जबाबदारी सोपविण्यात आली. एम्प्रेस मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती. कामगारांची संख्याही मोठी आणि त्याच्या तुलनेत उत्पादन तूटपुंजे होते. या मिलमध्ये पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा उद्योगसमूहाला केली; पण काही संचालकांनी त्याला विरोध केल्याने अखेर ही मिलही बंद करण्यात आली. रतन टाटांच्या नावावर दुसरे अपयश जमा झाले. या सर्व प्रकारामुळे रतन टाटा दुखावले गेले तरी या अनुभवातून त्यांना खूप काही शिकायला मिळाले होते. (Ratan Tata)
जेआरडी टाटा यांनी त्यांच्याकडे टाटा इंडस्टीजची सूत्रे सोपविली, त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योगसमूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झाले होते. १९९१ मध्ये जेआरडी टाटा यांनी उद्योगसमूहाची सूत्रे रतन टाटा यांच्याकडे सोपवून निवृत्ती पत्करली. त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत. कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगभरातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. ` भव्य स्वप्ने पाहणे आणि ती साकार करणे` हा रतन टाटांचा स्वभाव. याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनोची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नसल्याचे त्यांनी सिद्ध केले. हे यश मिळवत असतांना टाटांनी कधीच आपल्या मूल्यांशी तडजोड केली नाही. यामुळेच सचोटी, गुणवत्ता म्हणजे टाटा हे समीकरण तयार झालंय. टाटा हा शब्द विश्वासार्हता या शब्दाचा प्रतिशब्द बनला. (Ratan Tata)
टाटा समूह वेगळ्या उंचीवर
जमशेटजी टाटा यांनी टाटा समूहाचे रोपटे लावले, नुसते लावलेच नाही तर त्याची आदर्श देखभाल केली आणि त्याच्या सर्वांगीण वाढीसाठी दिशा दिली. दोराब टाटा यांनी आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करतानाच ही परंपरा अधिक मजबूत बनवली. नौरोजी सकलाटवाला यांनी या परंपरेला धक्का लागू दिला नाही. भारतीय उद्योगक्षेत्राच्या पितामहांपैकी एक म्हणून ओळखले जाणा-या जेआरडी टाटा यांनी टाटा समूहाची प्रतिमा उंचावली, समूह अधिक व्यापक आणि परोपकारी बनवला. १९९१ मध्ये सूत्रे घेणा-या रतन टाटा यांनी टाटा समूहाला एका वेगळ्या उंचीवर नेताना त्याची सामाजिक जाणीव अधिक व्यापक बनवली. (Ratan Tata)
देश-विदेशातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी रतन टाटा यांचा गौरव करण्यात आला आहे. २००० साली मिळालेला पद्मभूषण आणि २००८ साली मिळालेला दुस-या क्रमांकाचा नागरी सन्मान पद्मविभूषणचा त्यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्र सरकारने `महाराष्ट्र भूषण` हा आपला सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. २००८मध्येच त्यांचा नॅसकॉम ग्लोबल लीडरशीप सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे ते सदस्य आहेत. कॉर्नेल विद्यापीठाच्या रॉबर्ट एस पुरस्काराने त्यांना २००६ मध्ये सन्मानित करण्यात आले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सतर्फे त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. टाइम मॅगेझनने २००८ मध्ये जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तिंच्या यादीत त्यांचा समावेश केला होता.
STORY | Ratan Tata — part corporate titan, part secular living saint
READ: https://t.co/OYxo0p96nJ#RatanTata pic.twitter.com/4p8nGacI9N
— Press Trust of India (@PTI_News) October 9, 2024
हेही वाचा :