मुंबई : विशेष प्रतिनिधी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संजय घाडी आणि उपनेत्या प्रवक्त्या संजना घाडी, व मागाठाणे विधानसभेतील अनेक उप शाखाप्रमुख, गट प्रमुख, शाखाध्यक्ष आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यानंतर संजना घाडी यांची शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उपनेते आणि प्रवक्तेपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. (Ghadi)
यावेळी माजी नगरसेवक राम रेपाळे ,विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे ह्या उपस्थित होत्या. पक्ष प्रवेशाने महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला धक्का बसला आहे. (Ghadi)
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या निवडणुकीत ८० जागा लढवून ६० जागा जिंकलो तर कोणी १०० जागा लढवून २० जागा जिंकल्या, यावरुन खरी शिवसेना कोणाची यावर जनतेने शिक्कामोर्तब केले. त्यांच्या आरोपाला आरोपातून नाही तर कामातून उत्तर दिले. मुंबईत १५ ते २० वर्षांपूर्वी जी कामे व्हायला हवी होती ती आपण मागील अडीच वर्षात सुरु केली असल्याचे सांगितले. शिंदे यांनी केलेल्या कामाने प्रभावित होत मूळ शिवसेनेत प्रवेश केला असे संजय घाडी यांनी यावेळी सांगितले. (Ghadi)
हेही वाचा :