Gaza Story : वडील गेले, घरातील आठ माणसे हिरावली!

Hatem

जेरुसलेम : गेल्या वर्षी १४ मार्च रोजी रमजान सुरू झाला. त्याला पहाटे चार वाजता एका भावाचा फोन आला. (Gaza Story)

युद्धाच्या वेळी गाझात कुणाकडे चांगल्या बातम्या नसायच्याच.

‘त्याने सांगितले की अल-बुरेजमधील आमच्या घरावर हल्ला झाला. माझे वडील मारले गेले.’

हातेम देर अल-बालाह येथील अल-अक्सा शहीद रुग्णालयात जातो. जवळच्या मित्राला भेटतो. तो त्याला शवागारात नेतो.

‘तिथे गेलो तेव्हा वडिलांचा मृतदेह इतर आठ मृतदेहांशेजारी ठेवलेला. इतर सात म्हणजे माझी वहिनी आणि तिची मुले! सगळं सहन करण्यापलीकडचं धक्कादायक.’ (Gaza Story)

युद्ध सुरू झाल्यापासून त्याचे हेच आयुष्य बनले होते. बॉम्बस्फोटांत मारले गेलेले किंवा झालेल्यांपैकी अनेकजण त्याचे शेजारी. त्यांच्यासह तो खेळला-बागडला, मोठा झाला.

हातेम अल-अतार, वय अवघे २५. अविवाहीत. कोणत्याही क्षणी त्याला मृत्यू कवेत घेऊ शकतो याची जाणीव त्याला होती. पण त्याचे धैर्य वाखाणण्यासारखे.

‘७ ऑक्टोबरपासून आतापर्यंत युद्धाचा हा काळ भयंकर होता. युद्धातील प्रत्येक सेकंद कठीण होता. तुम्ही तुमचा जीव कधीही गमावू शकता किंवा तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूची बातमी कधीही येऊ शकत होती, हेतेम सांगतो.

आता तो देर अल-बालाह येथील नागरी संरक्षण कार्यालयात तो त्याच्या साथीदारांसह बसला आहे. ते चॅट करतात आणि त्यांचे फोन तपासतात. प्रत्येकजण वाचलेला आहे. (Gaza Story)

त्यांचे ९४ साथीदार मारले गेले. तीनशेहून अधिक जखमी झाले.

नासेर रुग्णालयाजवळील एका घरात झालेल्या स्फोटाप्रमाणे हातेमसाठी मृत्यू जवळ होता.

तो सांगतो, ‘घराच्या आसपास काही लोक जखमी अवस्थेत पडलेत काही मृत्यूमुखी पडलेले. कुणी जिवंत आहे की मेलेले आहे हे पाहण्यासाठी आत प्रवेश केला. काही क्षणातच एक टोही क्षेपणास्त्र घरावर आदळले.’

एका सहकाऱ्याने घेतलेल्या फुटेजमध्ये तो इमारतीत शिरताना दिसत आहे. त्याच्या डावीकडे आगीचा भडाका उडालेला आहे.

एक मोठा स्फोट, पाठोपाठ धुराचे लोट, त्यातून एकजण धडपडत येतो, पण तो हातेम असत नाही.

त्याचे मित्र परत आत जातात. त्याला बाहेर ओढून आणतात. धुराच्या लोटामुळे त्याला खोकल्याच्या उबळ येत राहते. सहकारी हरेक प्रयत्न करतात. तो वाचतो. पण त्याच्या जवळचे इतर लोक इतके भाग्यवान नसतात. (Gaza Story)

तरीही, हातेम स्फोटांच्या ठिकाणी, कोसळणाऱ्या इमारतींमध्ये, मृत आणि अधूनमधून लोकांना जिवंत गाडलेल्या ढिगाऱ्यांकडे जात राहिला. त्याने अनेक मृतदेह बाहेर काढले. छिन्नविच्छिन्न शरीर पाहिले, ते भाग बाहेर काढले.

आता बॉम्बस्फोट आणि गोळीबार थांबलेत.

हवाई हल्ल्यांशिवायची ही पहिली रात्र. गेल्या १५ महिन्यांत असा विचारही कधी मनात आला नव्हता. हातेम आता भविष्यात गढून गेलाय. (Gaza Story)

आता त्याला उर्वरित शिक्षण घ्यायचेय, रोमान्स करायचाय. लग्नही करायचेय, पण विद्यापीठे सुरू झाली की पहिल्यांदा अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचेय.

कुणाच्यातरी युद्धज्वराने आयुष्याची राखरांगोळी झालेल्यांच्या अशा अनेक कथा आता बाहेर येतील…

(सौजन्य : बीबीसी)

Related posts

धोक्याची भाषा, राजकीय सक्ती आणि समाजाचा आत्मविश्वास

समाजप्रबोधनाचा ध्यास घेणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर  

सामाजिक कार्यकर्त्यां उल्का महाजन यांना यंदाचा कुसुम पुरस्कार