Rohidas Patil : माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन

धुळ्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे आज सकाळी धुळे येथे निधन झाले.

कोल्हापूर; प्रतिनिधी : धुळ्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास चुडामण पाटील  (वय ८४) यांचे आज  (दि.२७)  सकाळी धुळे येथे निधन झाले. काँग्रेसचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्यावर उद्या (दि.२८) सकाळी धुळ्यातील एस.एस.व्ही.पी.एस. कॉलेजच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ( Rohidas Patil )

गेल्या फेब्रुवारी महिन्यात रोहिदास पाटील ( Rohidas Patil ) त्यांच्या कोल्हापुरातील मुलीला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना फुप्फुसाचा आजार असल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारानंतर धुळ्याला परतले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यांच्यात पश्चात पुत्र, आमदार कुणाल पाटील आणि विनय पाटील, मुलगी स्मिता पाटील असा परिवार आहे. कोल्हापुरातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे ते सासरे होत.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी