Home » Blog » अजित पवार अनंतात विलीन

अजित पवार अनंतात विलीन

by प्रतिनिधी
0 comments
Ajit Pawar's funeral

बारामती : प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देशभरातील प्रमुख नेत्यांसह सर्वसामान्य कार्यकर्ते, बारामतीकर जनतेच्या अलोट जनसागरांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थितीतांना हुंदका आवरताना कठीन गेले. नेते कार्यकर्त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, खासदार शाहू छत्रपती, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राज्यातील अख्खे मंत्रीमंडळ, खासदार, आमदार यांच्यासह त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखेरचे दर्शन घेण्यासाठी अलोट जनमुदाय उपस्थित

काल बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ विमान कोसळून अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने देशाला धक्का बसला. पवार यांच्या कुटुंबातील सदस्यांनी बारामतीकडे धाव घेतली. शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार यांच्यासह राज्यातील नेत्यांनी बारामतीत धाव घेतली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे राज्यपाल देवव्रत आचार्य यांनी सुनेत्रा पवार यांचे सांत्वन केले. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्या संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले. शवविच्छेदनानंतर त्यांचा पार्थिव रात्री विद्या प्रतिष्ठानमध्ये आणले. यावेळी अंतिम दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अमर रहे, अमर रहे, अजित पवार अमर रहे, अजित पवार परत या अशा घोषणा कार्यकर्त्यांनी देत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. (Ajit Pawar’s funeral)

मुळ काटेवाडी गावातून अंत्ययात्रेस सुरुवात

आज गुरुवारी सकाळी त्यांचे पार्थिव काटेवाडी येथील घरी नेण्यात आले. तिथे अनेकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही अंत्यदर्शन घेतले.  काटेवाडीच्या घरासमोर बंदुकीच्या फैरी झाडून पोलिसांच्यावतीने शासकीय मानवंदना देण्यात आली. तिरंगा ध्वजात गुंडाळलेल्या पार्थिव घेऊन त्यांची अंतिम यात्रा सुरू झाली. काटेवाडीतून अजित पवारांचे पार्थिव बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आले. यावेळी खासदार शरद पवार, प्रताप पवार, राजेंद्र पवार, सुप्रिया सुळे, विजया पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी अंतिम दर्शन घेतले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पोहोचले. त्यांनी पवार कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. (Ajit Pawar’s funeral)

अमित शहांसह मान्यवरांनी पुष्पचक्र वाहिले

  अकरा वाजण्याच्या सुमारास अंतसंस्काराच्या विधीस सुरुवात झाली. यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या अश्रूंना बांध फुटला. त्यांना सावरण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुष्पचक्र वाहिले. त्यांनी पार्थ पवार आणि जय पवार यांचे सात्वंन केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर, खासदार शाहू छत्रपती,  केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रताप जाधव, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, शंभुराजे देसाई,  शिवेंद्रराजे भोसले, मंत्री अदिती तटकरे, प्रकाश आबिटकर, गणेश शिंदे, पंकजा मुंडे, मकरंद पाटील, नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे, मंगलप्रसाद लोढा, दत्तात्रय भरणे, मेघना बोर्डिकर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, खासदार विशाल पाटील, निलेश लंके, प्रफुल्ल पटेल, अमोल कोल्हे, धैयर्शिल मोहिते, श्रीकांत शिंदे, नरेश मस्के, संजय दिना पाटील, आमदार राणा जगजितसिंग पाटील, धनंजय मुंडे, विश्वजीत कदम,जयंत पाटील,, सचिन अहिर,  माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. (Ajit Pawar’s funeral)

पार्थ आणि जय पवारांकडून मुखाग्नी

पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर बिगूल वाजवून मानवंदना देण्यात आली. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित जनसमुदायाने अमर रहे, अमर रहे, अजित पवार अमर रहे अशा घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिस दलाकडून बंदूकीच्या फैरी हवेत झाडण्यात आल्या.  

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00