Home » Blog » Bjp criticizes Thackray: ठाकरे कुटुंबाचा पुनर्मिलन सोहळा : भाजपची टीका

Bjp criticizes Thackray: ठाकरे कुटुंबाचा पुनर्मिलन सोहळा : भाजपची टीका

by प्रतिनिधी
0 comments
Bjp criticizes Thackray

मुंबई : उद्धव आणि राज ठाकरे यांचा मुंबईतील संयुक्त मेळावा त्यांचे राजकीय भविष्य पुन्हा आजमावण्याचा आणि महानगरपालिका निवडणुकीपूर्वी गमावलेली पत परत मिळवण्याचा हताश प्रयत्न आहे. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम ठाकरे कुटुंबाचा पुनर्मिलन सोहळा होता, अशी टीका शनिवारी (५ जुलै) महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी केली. (Bjp criticizes Thackray)

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शाळांमध्ये पहिलीपासून हिंदीला तिसरी भाषा म्हणून लागू करण्याबाबतचे दोन सरकारी ठराव (जीआर) मागे घेतल्याबद्दल उद्धव आणि राज यांनी शनिवारी एकत्रित विजयी मेळावा घेतला.

त्यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, आम्ही एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत, असे सांगत आगामी महानगरपालिका निवडणुका एकत्र लढण्याचे संकेत दिले. (Bjp criticizes Thackray)

तसेच राज यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधत, शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे आम्हाला एकत्र आणू शकले नाहीत, मात्र फडणवीस यांनी ते काम केली, असा टोला लगावला.

ठाकरे बंधूंच्या या वक्तव्याचा समाचार भाजप नेते आणि राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी घेतला.

हताश प्रयत्न : आशिष शेलार

श्री. शेलार यांनी या कार्यक्रमाचे वर्णन शिवसेनेने (उबाठा) गमावलेला राजकीय आधार परत मिळवण्यासाठी केलेला एक हताश प्रयत्न असे केले. (Bjp criticizes Thackray)

ते म्हणाले, ‘‘ हा मेळावा भाषेच्या प्रेमासाठी नव्हती तर घराबाहेर काढलेल्या भावाच्या सार्वजनिक तुष्टीकरणासाठी होता. महापालिका निवडणुकीत भाजपच्या ताकदीच्या भीतीने त्यांना त्यांच्या बंधुत्वाची आठवण झाली.’’

ठाकरे कुटुंब शहरात त्यांचे कुशासन पुन्हा सुरू करण्यासाठी महापालिकेवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.

हा कार्यक्रम भाषेच्या मुद्द्यावरून झालेल्या निषेधापेक्षा कुटुंबाच्या पुनर्मिलनाचा होता, असे श्री. शेलार म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंशी हस्तांदोलन केले. केवळ गमावलेली राजकीय पत वाचवण्यासाठीच हा मेळावा आयोजित केला होता.

उद्धव ठाकरे दुटप्पी : बावनकुळे

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठी भाषेबाबतच्या भूमिकेत उद्धव ठाकरे यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप केला. (Bjp criticizes Thackray)

‘‘मराठीचे समर्थन करण्याच्या नावाखाली, उद्धव ठाकरे यांनी आज वरळीतील मेळाव्यात सत्ता गमावल्याचे दुःख व्यक्त केले. परंतु २०२२ मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याची शिफारस करणारा अहवाल का स्वीकारला हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही,’’ असे श्री. बावनकुळे यांनी ‘एक्स’वरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘‘मुंबई महापालिकेच्या सत्तेत असताना, त्यांनी मराठी भाषिक लोकांना बाजूला केले. आता ते पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी मराठीवरील प्रेमाचे प्रदर्शन करत आहेत. त्यांचे मराठीवरील प्रेम हे राजकीय नाटक आहे. निवडणुका जवळ आल्यावरच ते समोर येते. लोकांनी आता हा दुटप्पीपणातून लक्षात घेतले पाहिजे,’’ असे त्यांनी ठामपणे सांगितले.

निव्वळ राजकीय मेळावा : दरेकर

श्री. दरेकर यांनी दावा केला की, हा मेळावा निव्वळ राजकीय हेतूने आयोजित केला होता.

‘‘राज ठाकरे यांनी प्रामुख्याने मराठी भाषेच्या मुद्द्यावर भाष्य केले आणि पूर्वीच्या आरोपांपासून स्वतःचा बचाव केला, परंतु उद्धव ठाकरे यांचा सूर असहाय्यतेचा होता. सत्ता गमावल्याबद्दलचा त्यांचा पश्चात्ताप स्पष्ट दिसत होता,’’ असे ते म्हणाले. (Bjp criticizes Thackray)

नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मराठी लोकांनी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला आधीच पाठिंबा दर्शविला होता.

‘‘पाकिस्तानी लोकांनी आम्हाला मतदान केले का?… मराठी मतदारांनीच महायुतीला प्रचंड जनादेश दिला. मुंबईतही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक यांनी मराठी लोकांच्या पाठिंब्याने विजय मिळवला,’’ असे दरेकर म्हणाले.

हेही वाचा :
एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी : उद्धव ठाकरे
राज ठाकरेंचे आभार, पण रूदाली… : फडणवीस
उद्योजक केडियांनी मागितली माफी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00