केरळ : फटाक्यांची आतषबाजी करताना दुर्घटना; १५० हून अधिक जखमी

महाराष्ट्र ऑनलाईन डेस्क :  केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील विरकावू मंदिरात  फटाक्यांची अतिषबाजी करताना मोठी दुर्घटना झाली आहे. (Firecrackers Accident)  या दुर्घटनेत १५० हून अधिक लोक जखमी झाले. त्यापैकी दहाजण गंभीर आहेत. ही घटनासोमवारी (दि.२८) रात्री उशिरा घडली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मंदिरात फटाक्यांची अतिषबाजी सुरू होती.  फटाक्यांपैकी एक जवळच्या शेडमध्ये पडला असावा जिथे अधिक फटाके साठवले गेले होते.

Firecrackers Accident : १५० हून अधिक जखमी

माहितीनुसार, केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील मंदिरात फटाक्यांच्या अतिषबाजी दरम्यान झालेल्या दुर्घटनेत १५० लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी दहाजण गंभीर जखमी आहेत. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  घटनास्थळावरील  दृश्यांमध्ये फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे आणि धुराचे ढग दिसून येत होते.

Firecrackers Accident : दक्षतेचा अभाव ?

स्थानिकांच्या माहितीनुसार, फटाक्यांची अतिषबाजी करण्याच्या ठिकाणाजवळच फटाक्यांचे  भांडार आहे. पंचायत प्रतिनिधींनी दक्षतेचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. स्थानिक प्रभाग सदस्य ई शजीर माध्यमांशी बोलताना म्हणाले  “मंदिरात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची अतिषबाजी केली जात नाही. ही एक छोटीशी घटना आहे. तर फटाक्यांचे भांडार आणि अतिषबाजी ठिकाणामधील अंतराबाबत अधिक खबरदारी घ्यायला हवी होती,” कासारगोडचे जिल्हाधिकारी इनबसेकर के म्हणाले, फटाके फुटतात तेथून किमान १०० मीटर अंतरावर फटाके साठवले पाहिजेत पण इथे हे अंतर काही फूटच आहे.

मंदिर समितीचे अध्यक्ष आणि सचिव पोलिसांच्या ताब्यात

मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी टिन शेडने झाकलेल्या तात्पुरत्या स्टोअरमध्ये सुमारे २८ हजार किमतीचे कमी तीव्रतेचे फटाके साठवले होते. या कॅशेचा स्फोट झाला, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. दरम्यान मंदिर समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांना पोलीसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा

 

Related posts

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

आयफोन आता ‘देवा’चा झाला !