कोल्हापूर : प्रतिनिधी : गुन्हा मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील तीन महिलांसह चौघांना अटक केली. कोर्टाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (Farmers demanded ransom)
करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथे मारुती एकशिंगे शेती करतात. त्यांचा ऊस वाहतुकीचा व्यवसाय आहे.मारुती एकशिंगे यांचा मुलगा गणेश ट्रॅक्टरने ऊस वाहतूक करतो. सोलापूर येथील ऊस तोडणी मजुरांची टोळी एकशिंगे यांच्याकडे दोन वर्षापूर्वी काम करत होती. या टोळीतील एका महिलेची गणेश एकशिंगे यांच्याशी ओळख झाली होती. दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर संबधित महिलेने गणेश एकशिंगे याच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात अत्याचार केल्याबद्दल आठवडा भरापूर्वी गुन्हा दाखल केला होता. पिडित महिलेने गणेश यांचे वडील मारुती एकशिंगे यांच्याशी संपर्क साधत गुन्हा मागे घेण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. (Farmers demanded ransom)
दरम्यान मारुती शिंदे यांनी पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी पिडित महिलेसह चौघां विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी पिडित महिलेसह चौघांना अटक केली. त्यांच्याकडून रोख १२ हजार रुपये आणि इतर साहित्य असा ७२ हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय. या गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील अधिक तपास करीत आहेत. (Farmers demanded ransom)