Home » Blog » Protest against Wangchuk’s arrest : वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडी कडून मोर्चोचे आयोजन

Protest against Wangchuk’s arrest : वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडी कडून मोर्चोचे आयोजन

by प्रतिनिधी
0 comments
Protest against Wangchuk's arrest

कोल्हापूर : प्रतिनिधी :  लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा. यासाठी लढणारे सोनम वांगचुक यांना हुकुमशाही पद्धतीने तुरुंगात डांबून ठेवल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीने सोमवारी  १३ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय आज झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. अजिंक्यतारा कार्यालय येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. (Protest against Wangchuk’s arrest)

 लडाखच्या जनतेच्या शांततामय लोकशाही मार्गाने चाललेल्या सत्याग्रहाचे नेते सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील संविधानप्रेमी जनतेच्या वतीने भाजप सरकारच्या या हुकुमशाहीचा निषेध कार्यक्रम ठरवण्यासाठी इंडिया आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज अजिंक्यतारा कार्यालय येथे झाली. या बैठकीत केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला. (Protest against Wangchuk’s arrest)

सोनम वांगचुक यांची अटक बेकायदेशीर असून, त्यांची ताबडतोब सुटका करण्यात यावी अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्लाचा प्रयत्न, यांशिवाय न्याय हक्कासाठी लढणाऱ्याना देखील हुकूमशाही पद्धतीने तुरुंगात डांबण्यात येत असेल तर, मोदी सरकारची ही हुकूमशाही संविधानावर चालणाऱ्या देशासाठी घातक असल्याची तीव्र प्रतिक्रिया आहे यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते उदय नारकर यांनी व्यक्त केली. सोनम वांगचूक यांची तातडीने सुटका करण्यात यावी, याशिवाय केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा निषेध म्हणून इंडिया आघाडीच्या वतीने, १३ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. दसरा चौकातून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याच यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी यावेळी सांगितले. (Protest against Wangchuk’s arrest)

या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, डीजी भास्कर, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, शिवाजीराव परुळेकर, अनिल घाटगे, अभिजीत कांबळे, बाबुराव कदम, भारती पोवार, चंद्रकांत जाधव, सम्राट मोरे, सुभाष देसाई, विजय सूर्यवंशी, सुजय पोतदार, सुनिल देसाई, दिग्वीजय मगदूम, भरत रसाळे, मोहन सालपे आदी उपस्थित होते. (Protest against Wangchuk’s arrest)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00