Home » Blog » Sattyacha Morcha : विरोधक ‘सत्याच्या मोर्चा’तून करणार शक्तीपदर्शन   

Sattyacha Morcha : विरोधक ‘सत्याच्या मोर्चा’तून करणार शक्तीपदर्शन   

by प्रतिनिधी
0 comments
Sattyacha Morcha

मुंबई : प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी सदोष मतदारयाद्या करा, या मागणीसाठी महाविकास आघाडी, मनसे यांच्यासह विरोधी पक्षाकडून जोरदार शक्तीपदर्शन करण्यात येणार आहे. मोर्चासाठी मुंबईसह उपनगरातून, ठाणे, नवी मुंबईतून कार्यकर्ते लोकलने चर्चगेटकडून निघाले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दादर ते चर्चगेट लोकल प्रवास करुन ते मोर्चाच्यास्थळी निघाले आहेत. दुपारी एक वाजण्याच्या सुमरास दक्षिण मुंबईतील फॅशन स्ट्रीट ते आझाद मैदान व्हाया मेट्रो सिनेमा असा सत्याचा मोर्चा निघणार आहे. (Sattyacha Morcha)

या मोर्चात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेनेचे कार्याध्यक्ष माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शेकापचे माजी आमदार जयंत पाटील, भाकपचे प्रकाश रेड्डी या प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

सर्व मतदार याद्या अद्यायावत करा, मतदार याद्यातून दुबार नावे वगळा, मतदार याद्या अद्यायावत करेपर्यंत निवडणुका घेऊ नका, मतदार नोंदणी सात नोव्हेंबर सुरू ठेवा अशा मागण्या केल्या जाणार आहेत. (Sattyacha Morcha)

मोर्चाच्या मार्गावर सत्या मोर्चाचे फलक लागले आहेत. डिव्हाएडरवर विरोधी पक्षांचे झेंडे लावण्यात आले आहेत. सकाळपासून दक्षिण मुंबईत मोर्चात सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते रवाना होत आहेत. मनसेचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी होण्यासाठी अग्रेसर आहेत. कार्यकर्त्याकडून निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी केली जाणार आहे. मोर्चा मुंबई महानगरपालिकेवर आल्यावर विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची भाषणे होणार आहेत.

मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, आमदार  अंबादास दानवे, अदित्य ठाकरे, अनिल परब, सचिन अहिर, सुनिल प्रभू, सुनील शिंदे, माजी खासदार राजन विचारे, मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, नसीम खान, सचिन सावंत, आमीन पटेल सहभागी होणार आहेत. (Sattyacha Morcha)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00