Home » Blog » Commissioner Manjulaxmi : कोल्हापूर शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा

Commissioner Manjulaxmi : कोल्हापूर शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा

by प्रतिनिधी
0 comments
Commissioner Manjulaxmi

कोल्हापूर  : प्रतिनिधी : ऐन गणेशोत्सवात  काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील तीन पंपापैकी एक पंप नादुरुस्त झाल्याने शहरातील अनेक भागात पाण्याचा ठणठणाट झाल्याने महानगरपालिका प्रशासनाने सी आणि डी वॉड वगळता ए, बी, ई वॉर्डासह उपनगरात एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.  अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांसह महिला रस्त्यांवर उतरल्याने पुरेसा आणि जादा दाबाने पाणीपुरवठा व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. (Commissioner Manjulaxmi)

आज गुरुवारपासून ए व बी वॉर्ड तसेच संलग्न उपनगर आणि ग्रामीण भागातील परिसरात एक दिवस आड पाणीपुरवठा होईल. या अंतर्गत पुईखडी परिसर, सानेगुरुजी वसाहत, राजे संभाजी परिसर, आपटेनगर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, जरगनगर, नानापाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, साळोखेनगर, राजीव गांधी नगर, महाराष्ट्र नगर, सुर्वे नगर, आयटीआय परिसर, जोगेश्वरी कॉलनी, रायगड कॉलनी, बालाजी पार्क, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, शेंडापार्क आदी सर्व परिसरांचा समावेश आहे. (Commissioner Manjulaxmi)

            ई वॉर्ड मध्ये शुक्रवारी २९ ऑगस्ट पासून ई वॉर्डात एक दिवस आड पाणीपुरवठा होईल. यात राजारामपुरी पहिली ते तेरावी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, दौलतनगर, शाहूपूरी, राजेंद्रनगर, रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, लोणार वसाहत, लिशा हॉटेल परिसर, महाडीक वसाहत आदी परिसरांचा समावेश आहे. तसेच सी व डी वॉर्डला मात्र नियमित पाणीपुरवठा सुरू राहील.

            तरी नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे आणि महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे. ज्या भागात नळाद्वारे पाणीपुरवठा होणार नाही, त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. टँकरसाठी कळंबा फिल्टर हाऊस मधील गणेश लोंखडे (मो. 9766360506)  आणि कसबा बावडा फिल्टर हाऊस येथील  संभाजी पाटील (मो. 9860448844) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Commissioner Manjulaxmi)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00