Home » Blog » नीरव मोदी घोटाळ्याचे तपास करणाऱ्या अधिकाऱ्याचा शौचालयात मृत्यू

नीरव मोदी घोटाळ्याचे तपास करणाऱ्या अधिकाऱ्याचा शौचालयात मृत्यू

by प्रतिनिधी
0 comments
Investigating officer in the Nirav Modi scam dies in a restroom

आगरतळा : हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्याशी संबधित १३ हजार कोटी रुपयांचा पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचे तपास करणारे अधिकारी आयपीएस अनुराग धनकर यांचा पोलिस मुख्यालयातील त्याच्या कार्यालयातील शौचालयात मृतावस्थेत आढळले. सध्या ते त्रिपुराचे डीजीपी होते. त्रिपुराचे राजधानी आगरतळा येथे ही घटना घडली. (Investigating officer in the Nirav Modi scam dies in a restroom)

शीखविरोधी दंगल पुनर्तपासणी एसआयटी प्रमुख

१९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आणि त्रिपुराचे डीजीजपी अनुराग धनकर हे १९८४ च्या शीखविरोधी दंगलीची पुनर्तपासणी करणाऱ्या एसआयटीचे प्रमुख होते. साठ वर्षीय धनकर हे नेहमीपेक्षा जास्त वेळ शौचालयात थांबले होते. त्यांच्या मदतनीसाने आरडाओरड केल्यानंतर आतून कुलुप असलेला दरवाजा फोडण्यात आला. त्यांना आगरतळा येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. पण उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यांनी आत्महत्या केली आहे का यादृष्टीने पोलिस तपास करत आहे. (Investigating officer in the Nirav Modi scam dies in a restroom)

मुख्यमंत्री साहांनी घेतली तातडीची मंत्रीमंडळाची बैठक

 या घटनेची माहिती कळताच त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी तातडीने पोलिस मुख्यालयात माहिती घेतली आणि तातडीने मंत्रीमंडळाची बैठक घेतली. धनकर यांच्या मृत्यूचे सत्य उघडकीस आणण्यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले. त्रिपुरा सरकारने एक दिवसाचा राज्यव्यापी दुखवटा जाहीर केला. विरोधी पक्षांनी स्वतंत्र न्यायालयीन चौकशी मागणी केली आहे.  त्यांच्याजागी अतिरिक्त डीजीपी गोदुगुलुरी श्रीनिवास राव यांची प्रभारी पोलिस प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

मृत्यूपूर्वी मानसिक तणावाखाली?

विरोधी पक्षनेते जितेंद्र चौधरी यांनी सरकारला असे आवाहन केले आहे की धनकर यांचा मुलगा कॅनडाहून परत येईपर्यंत मृतदेह जतन करुन ठेवावा. काँग्रेसचे आमदार सुदीप रॉय बर्मन यांनी मृत्यूपूर्वी कथितरित्या मानसिक तणावाखाली होते असा दावा केला आहे.  (Investigating officer in the Nirav Modi scam dies in a restroom)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!