Home » Blog » अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार

by प्रतिनिधी
0 comments
Food and Drug Inspector exam paper leaked

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या अन्न व औषध निरीक्षकपदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. या परीक्षेतील १०० पैकी ९० प्रश्न सोशल मिडियावर व्हायरल झाल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून केला होता. एमपीएससीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार करण्यात येणार असल्याचे एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी एका व्हिडिओद्वारे केली आहे. (Food and Drug Inspector exam paper leaked)

१२ लाखाला पेपर फुटला

आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत या परीक्षेचा पेपर १२ लाख रुपयांना विकला गेला असून पाच लाख आगाऊ रक्कम दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. राज्याभरातून या परीक्षेवर आरोप झाल्यानंतर गौरव पाटील आणि लोकेश पाटील या तक्रारदार तरुणांनी एमपीएससीकडे तक्रार केली. त्यानतंर दोघांनी एमपीएससीकडे अचानक ईमेल पाठवून आपली तक्रार खोटी आणि बनावट असल्याचे आयोगाला कळवले. यावरही रोहिप पवारांनी टीका केली. तक्रारदारांवर दबाव टाकण्यात आल्याचा दावा केला. अहिल्यानगर येथील तक्रारदार ऋषिकेश गांगर्डे या विद्यार्थ्याने तक्रार मागे घेण्यास नकार दिला. ऋषिकेशने या घोटाळ्यातील संशयितांचे मोबाईल फॉरेन्सिक द्वारे तपासण्याची मागणी केली आहे. या पेपरफुटीवर यापूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार विजय वडेट्टीवार, शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले आहेत. (Food and Drug Inspector exam paper leaked)

एमपीएससीकडून गांभीर्याने दखल

रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर एमपीएससीचे सचिव महेंद्र हळपाळकर यांनी एक व्हिडिओ जारी केला. “अन्न व औषध प्रशासन विभागातील ‘औषध निरीक्षक (गट-ब)’ भरती परीक्षेतील पेपरफुटीबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करून संबंधितांविरोधात पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार आहे.” अशी माहिती त्यांनी दिली. पेपरफुटीची बातमी समोर येताच, सीबीडी बेलापूर येथील एमपीएससी कार्यालयात या संदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी सांगितले. (Food and Drug Inspector exam paper leaked)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!