Farmer Son Suicide : मुलाने गळफास घेतलेल्या दोरीनेच…

Farmer Son Suicide

छत्रपती संभाजीनगर : दहावीत शिकणाऱ्या मुलाला स्मार्टफोन हवा होता. परिस्थिती बेताची असल्याने बापाने असमर्थता दर्शवली. या रागाने मुलाने शेतातील वस्ती गाठली. तो झोपायला गेला असेल असे घरच्यांना वाटले, मात्र बराच वेळ तो आला नाही म्हणून वडील पाहायला गेले. समोरचे दृश्य पाहून त्यांना प्रचंड धक्का बसला. मुलाने गळफास घेतला होता. वडिलाने याही स्थितीत त्याचा मृतदेह उतरवून खाली ठेवला आणि त्याच गळफासाने स्वत:ही गळफास घेतला. (Farmer Son Suicide)

नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील मिनकीमध्ये गुरुवारी ही हृदयद्रावक घटना घडली. ओमकार असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. राजेंद्र पैलवार असे त्याच्या वडीलांचे नाव आहे. या कुटुंबाला तीन मुले. त्यात ओमकार हा सर्वांत लहान. त्याला उदगीर येथे वसतिगृहात ठेवले होते. मकर संक्रांतीसाठी तो गावी आला होता.(Farmer Son Suicide)

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकारला अभ्यासासाठी स्मार्टफोन हवा होता. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्याने कुटुंबाने असमर्थता दर्शवली होती. पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली आहे.

या प्रकरणाचा तपास करत असलेले उपनिरीक्षक दिलीप मुंडे यांनी सांगितले की, मुलाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसापासून मुलाने पतीकडे मोबाईलसाठी तगादा लावला होता. (Farmer Son Suicide)

‘मुलाने बुधवारी संध्याकाळी पुन्हा मोबाईलचा विषय काढला. तथापि, शेती आणि वाहनासाठी घेतलेले आधीच्याच कर्जाची परतफेड करावी लागत असल्याने वडिलांनी स्मार्टफोन घेण्यास असमर्थता दर्शवली. वडिलांच्या उत्तरानंतर नाराज होऊन मुलगा बाहेर पडला.’

‘मुलगा झोपायला शेतात गेला असावा, असे त्याच्या पालकांना वाटले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी न परतल्याने त्याच्या आई-वडिलांनी आणि दोन भावांनी शोधाशोध सुरू केली. त्याचे वडील शेतात गेले. मात्र समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. मुलाने झाडाला दोरीने गळफास घेतला होता. धक्का सहन न झालेल्या वडिलाने मुलाचा मृतदेह खाली उतरवला आणि त्याच दोरीने स्वत: गळफास लावून घेतला,’ असे मुंडे यांनी सांगितले.(Farmer Son Suicide)

दरम्यान, कुटुंबातील इतर लोकही शेतात गेले. त्यांनाही जोराचा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. शवविच्छेदनानंतर गुरुवारी सायंकाळी त्यांच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

रेल्वे स्टेशनची इमारत कोसळली

Related posts

Building Collapse : रेल्वे स्टेशनची इमारत कोसळली

ACB Raid : लाच घेताना दोघांना अटक

Dewas Crime : नऊ महिने फ्रीजमध्ये होता मृतदेह