elephant-turns-violent हत्तीने सोंडेने गरगरा फिरवले आणि फेकले

elephant turns violent

मलप्पुरम : दरवर्षीप्रमाणे येथे वार्षिक ‘नेरचा’ उत्सव सुरू होता. सजवलेले हत्ती पारंपरिक वाद्यांच्या तालावर डोलत होते. उत्सवासाठी प्रचंड गर्दी झाली होती. अनेकजण हे दृश्य मोबाइलच्या कॅमेऱ्यात टिपत होते. तोच एका हत्तीने एकाच्या पायात सोंड घातली. त्याला उचलले गरगरा फिरवले आणि फेकून दिले. क्षणार्धात घडलेल्या या घटनेने सगळे सैरावैरा पळू लागले. त्यातही अनेकजण चिरडले गेले. (elephant turns violent)

केरळच्या मलप्पुरममधील तिरूर येथे घडलेल्या या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तेथे आणलेल्या चार हत्तींपैकी एक हत्ती हिंसक झाला आणि त्याने एका माणसाला सोंडेत उचलून जोरात हलवत नंतर फेकून दिल्याचे या व्हिडीओत दिसते.(elephant turns violent)

हा प्रसंग पाहून लोक सैरावैरा पळू लागले, जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या सुरक्षित ठिकाणी त्यांनी आसरा घेतला. हत्तीने फेकलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला कोट्टाक्कल येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील पट्टांबी मशिदीत हा वार्षिक उत्सव होतो. मलबार प्रदेशातील एक आदरणीय मुस्लिम संत अलूर वालिया पुकुंजीकोया थांगल यांच्या स्मरणार्थ होणाऱ्या या भव्य कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. संपूर्ण पट्टांबी शहर या दरम्यान रंगीबेरंगी रोषणाईने उजळून निघते. या महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवात राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक आणि पर्यटक सहभागी होतात.

हेही वाचा :
लग्नाच्या वाढदिवसाचा केप कापला, आणि…

Related posts

hair-smuggling : ८० लाखांचे केस!

Dead Body in Plane : विमानाम दोन मृतदेह आले कसे?

Pakistan wedding : पाकमध्ये सहा भावांचा सहा बहिणींशी विवाह