DA hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज

DA hike

DA hike

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना शुक्रवारी (२८ मार्च) गुड न्यूज दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (डीए) २ टक्क्यांनी वाढवण्यात आला.(DA hike)

कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई मदत (डीआर) चा अतिरिक्त हप्ता जारी करण्यासही मान्यता देण्यात आली. १ जानेवारी २०२५ पासून लागू सुधारीत डीए आणि डीआरची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे सध्याचा मूळ वेतनाचा दर ५५ टक्के होणार आहे. निवृत्तीवेतनाचा दरही ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के होणार आहे. (DA hike)

हा निर्णय महागाईची तीव्रता कमी करण्यासाठी आणि सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा ठरणार आहे, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. महागाई दरातील ही वाढ ७ व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार आहे. (DA hike)

मंजूर केलेल्या वाढीचा फायदा सुमारे ४८.६६ लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि ६६.५५ लाख निवृत्तीवेतनधारकांना होईल. डीए आणि डीआर वाढीच्या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. या वाढीमुळे दरवर्षी ६,६१४.०४ कोटी रुपये इतका आर्थिक बोजा सरकारला सोसावा लागेल, असा अंदाज आहे.

सुधारित डीए आणि डीआर येत्या पगार आणि पेन्शनमध्ये वितरित करण्यात येणार आहे. थकबाकी १ जानेवारी २०२५ पासून देय असणार आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या उत्पन्नाचे खरे मूल्य राखण्यासाठी सरकार चलनवाढीच्या ट्रेंड आणि किंमत निर्देशांकांवर आधारित डीए आणि डीआर दरांमध्ये वेळोवेळी सुधारणा करते.

हेही वाचा :
विरोध निष्फळ, न्या. वर्मा यांची बदली
शक्तीशाली भूकंपामुळे म्यानमार, थायलंडमध्ये हाहाकार

Related posts

Anant Dixit award

Anant Dixit award: अनंत दीक्षित पुरस्कार कुमार केतकर यांना

Pope Francis died

Pope Francis died : पोप फ्रान्सिस यांचे निधन

Rahul Gandhi statement

Rahul Gandhi statement : अमेरिकेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घोटाळ्याची चर्चा