जपान एअरलाइन्सवर सायबर हल्ला

Japan Airlines

टोकिओ : जपान एअरलाइन्स (जेएएल) वर गुरुवारी सकाळी सायबर हल्ला झाला. त्यामुळे जपानच्या सर्वांत व्यस्त असलेल्या या विमानसेवेवर विपरीत परिणाम झाला. सुट्टीसाठी प्रवासाला निघालेल्या अनेक प्रवाशांचे वेळापत्रक बदलावे लागले. काही फ्लाइटला उशीर झाला. काही काळ तिकीट विक्रीही स्थगित करावी लागली. (Japan Airlines)

स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेसातच्या सुमारास हा सायबर हल्ला झाला. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर विपरीत परिणाम झाला. जेएएल अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एअरलाइनला राउटर तात्पुरते बंद करण्यास भाग पाडले. त्यामुळे एकूण सिस्टममध्ये बिघाड झाला.

रॉयटर्सने वृत्त दिलेल्या वृत्तानुसार या सायबर हल्ल्यामुळे देशांतर्गत २४वर उड्डाणे उशीरा झाले.  जवळपास अर्धा तास उशीराने उड्डाण होत होते. एअरलाइन्सने गुरुवारी उड्डाण होणाऱ्या सर्व फ्लाइटची तिकीट विक्रीही स्थगित केली. जपानी अधिकारी या घटनेची चौकशी करत आहेत. (Japan Airlines)

जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव योशिमासा हयाशी यांनी ही सर्व यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आणि बाधित प्रवाशांसाठी योग्य निवास व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश परिवहन मंत्रालयाला दिले आहेत. दूरचित्रवाणी फुटेजमध्ये टोकियोच्या हानेडा विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. कारण नवीन वर्षाच्या सुट्टीचा हंगाम सुरू झाल्यामुळे अनेक प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन केले आहे. या हंगामात देशात मोठ्या संख्यने प्रवासी बाहेर पडतात.

हेही वाचा :

Related posts

Rahul Gandhi visit

Rahul Gandhi visit: दहशतवादाविरुद्ध एकजूट असणे महत्त्वाचे

Barcelona

Barcelona : बर्सिलोना विरुद्ध रियल मद्रिद

Top Terrorist killed

Top Terrorist killed: ‘एलईटी’च्या दहशतवाद्याचा खात्मा