कोल्हापूर; प्रतिनिधी : प्लॉटचे सामिलीकरण करण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या इचलकरंजीतील नगर भूमापन अधिकारी दुष्यंत विश्वास कोळी (रा. सांगली रोड, इचलकरंजी, मुळ गाव शिरोळ, जि. कोल्हापूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (Bribe News)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची माहिती दिली. हातकणंगले तालुक्यातील मौजे शहापूर येथे तक्रारदारांच्या प्लॉटचे सामिलिकरण होण्याकरिता तक्रारदाराने इचलकरंजी नगर भूमापन अधिकारी कार्यालय येथे २२ जुलै २०१४ रोजी अर्ज दिले होते. तेथील एका कर्मचाऱ्याने तक्रारदाराशी संपर्क साधला. तुमच्या अर्जाचे काम कोल्हापूरातील जिल्हा अधीक्षक भूमिलेख कार्यघ्लयात आहे. तेथील कामाचा चार्ज माझ्याकडून असून मी इचलकरंजीतून तुमच्या अर्जाला मंजूरी आणू शकते असे तक्रारदाराला सांगितले. त्यासाठी त्या कर्मचाऱ्याने ३० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला. (Bribe News)
तक्रार अर्जाची पडताळी करुन पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली. तक्रारदाराच्या अर्जाचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याने तक्रारदाराला इचलकरंजी नगर भूमापन अधिकारी दुष्यंत कोळी यांना भेटण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने कोळी यांची भेट घेतली असता प्लॉटचे सामिलीकरण कोल्हापूर कार्यालयातून करुन घेण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पण्ण झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इचकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात लाचेची तक्रार दाखल केल्यानंतर दूष्यंत कोळी याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केला असता त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (Bribe News)
कोल्हापूर विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक बापू साळुंखे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, हेड कॉन्स्टेबल संदीप काशिद, पोलिस नाईक सचिन पाटील, सुधीर पाटील, पूनम पाटील, प्रशांत दावणे यांनी कारवाईत भाग घेतला.
हेही वाचा :