मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब पदाची भरती प्रक्रिया अखेर रद्द केली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पेपरफुटीचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पेपरफुटीत राज्यभरात सक्रीय असलेल्या एजंटामार्फत ४०-४० लाख रुपयांना पेपर विकला गेल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. (MPSC exam papers sold for ₹40 lakh each)
पोलिसांच्या चौकशीत पेपर फुटल्याचे निष्पन्न
२२ मार्च २०२६ रोजी औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा आरोप परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी केला होता. मुंबई पोलिस गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात पेपर फुटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पेपर फुटीचे चॅटिंग परीक्षेनंतर व्हायरल झाले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने फुटलेला पेपर एकाच व्यक्तीकडे पोहोचला होता असा दावा केला आहे. एमपीएससीच्य स्पष्टीकरणाला विरोधी पक्ष आणि विद्यार्थ्यांनी टीका करत हे स्पष्टीकरण हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. . (MPSC exam papers sold for ₹40 lakh each)
एमपीएससीकडून पेपरफुटी प्रकरण दडपण्याचे प्रयत्न
पेपरफुटीचे प्रकरण दाबण्याचा पयत्न केला होता असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसेच तपास यंत्रणेकडे त्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. आयोगाने चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी त्यांनी केली. पेपरफुटीतील एजंटाची नावे एमपीएससीला दिली होती. पण आयोगाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही रोहित पवारांनी दिला. आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली.
फेरपरीक्षेचे आयोजन होणार
पारदर्शकता टिकवण्यासाठी परीक्षा रद्द केली आहे असा खुलासा एमपीएससीने केला आहे. आयोगाकडून लवकरच फेरपरीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. पात्र उमेदवारांना फेरपरीक्षेसाठी पुन्हा कोणतीही नवीन अर्ज करण्याची किंवा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट केले आहे. . (MPSC exam papers sold for ₹40 lakh each)