Home » Blog » अंबाबाईच्या जागरादिवशी  महिषासुरमर्दिनी रुपात पूजा

अंबाबाईच्या जागरादिवशी  महिषासुरमर्दिनी रुपात पूजा

by प्रतिनिधी
0 comments
Worship of Ambabai in the form of Mahishasurmardini

कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवात देवीचा जागर हा महत्वाचा दिवस समजला जातो. करवीर निवासिनी अंबाबाईची जागरादिवशी महिषासुरमर्दिनी रुपात बांधण्यात आला. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रात्री देवीची वाहनातून नगरप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. (Worship of Ambabai in the form of Mahishasurmardini)

नवरात्र उत्सवात देवीचा जागर असल्याने घरोघरी चौक मांडण्यात आले. ऊसाच्या कमानी आणि ज्वारीच्या धाटांचे चौक मांडून अंबाबाईचा जागर करण्यात आला. अंबाबाईच्या जागराचे औचित्य साधून अंबाबाई महिषासुरमर्दिनी रुपात पूजा बांधण्यात आली. धार्मिक ग्रंथात देवीकडून महिषारसुराचा वध झाला अशी कथा सांगितली जाते.  महाबली व पराक्रमी असा महिषासुर सर्व देवांचा पराभव करून त्रैलोक्याचा स्वामी झाला. तेव्हा पराभूत देवगण, ब्रह्मदेवासह देवाधिदेव श्री शंकर व श्री महाविष्णूंकडे गेले व त्यांना दुष्ट महिषासुराचा सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा विष्णूंसह सर्व देवांच्या शरीरातून तेज उत्पन्न झाले, यामध्ये एक दिव्यदेवता प्रगट झाली. हीच ‘महिषासुरमर्दिनी देवी’ होय. (Worship of Ambabai in the form of Mahishasurmardini)

देवतांना अभय देऊन ही देवी युद्धभूमीवर आली असता, विराट्सैन्यासह महिषासुर समोर आला. त्याचे देवीशी घनघोर युद्ध झाले. आपल्या मायावीशक्तीने महिषाने अनेक रूपे घेतली, अखेर महिषाचे (रेड्याचे) रूप धारण केलेल्या त्या दैत्यास देवीने ठार मारले. तेव्हा बाकीचे दैत्यसैन्य दाही दिशांनी पळून गेले. देवीच्या या रूपास महिषासुरमर्दिनी म्हणतात.

दक्षप्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी अत्यंत क्रोधाने भगवान् शिवांनी आपल्या शरीरातून भद्रकाली, महाघोर रुद्रगण, कोटियोगिनी इ. महाशक्तिगण निर्माण केला. या दिवशी नवरात्रातील महाष्टमी होती, यामुळे यादिवशी अष्टमीची पूजा, उपवास, मध्यरात्री जागरण, चंडीहोम यांचे विशेष महत्व आहे.

कोल्हापूर हे शिवपत्नी सतीमातेच्या एकावन्नपीठातील, प्रधान साडेतीन शक्तिपीठातील आद्यपीठ आहे, या ठिकाणी सतीचे त्रिनेत्र पडले असून, या ठिकाणी सतीमाता ही महिषमर्दिनीदेवी रूपात असून शिव हा क्रोधीशभैरव रूपात आहे. आजची पूजा श्रीपूजक उमेश उदगावकर, गजानन जोशी, योगेश जोशी, अवधूत गोरंबेकर यांनी बांधली. (Worship of Ambabai in the form of Mahishasurmardini)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!