Home » Blog » शेतकऱ्यांकडून ऊस दरांसाठी पुणे बेंगळूरु महामार्ग बंद  

शेतकऱ्यांकडून ऊस दरांसाठी पुणे बेंगळूरु महामार्ग बंद  

by प्रतिनिधी
0 comments
Pune-Bengaluru Highway blocked over sugarcane prices

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर ऊस दराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आणि महामार्ग रोको आंदोलन सुरू केले आहे. सात तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असून वाहतुकीची कोंडी झाली आहे. (Pune-Bengaluru Highway blocked over sugarcane prices)

एल निनो, गतवर्षी झालेले साखरेचे कमी उत्पादन आणि बाजारपेठेत कडालेले साखरेचे दर यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने यावर्षी १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यंदाच्या गाळप हंगामात उसाला प्रतिटन ५००० रुपये दर मिळावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. साखरेला प्रतिकिलो ५० रुपये हमीभाव मिळावा. इथेनॉलला प्रतिलिटर ७० रुपये दर मिळावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. जयसिंगपूर येथे १० ऑक्टोबर रोजी झालेल्या ऊस परिषदेत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कोगनोळी टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलनाचा इशारा शेट्टी यांनी दिला होता. (Pune-Bengaluru Highway blocked over sugarcane prices)

आज मंगळवारी कोगनोळी टोल नाक्यावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरूवात झाली. आंदोलनामुळे पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक थांबून पर्यायी ग्रामीण भागांतून वाहतूक वळवली आहे. कोगनोळीसह हत्तरगी टोल नाक्यावरही शेतकरी आंदोलन करत आहेत.

ऊसाचा दर आणि अन्य प्रश्नांवर शेतकरी संघटनेचे केंद्र सरकारबरोबर चर्चा सुरू होती. पण केंद्र सरकारने कोणताच निर्णय जाहीर न केल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन तीव्र करण्यासाठी कोगनोळी टोल नाक्यावर मुक्काम करण्याची तयारी शेतकऱ्यांनी दाखवली आहे. कागल आणि निपाणी भागातील गावांमधून शेतकऱ्यांसाठी भाकरी आणि पिठलं गोळा केले जात आहे. (Pune-Bengaluru Highway blocked over sugarcane prices)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!