Home » Blog » अदानी-अंबानींचे २० लाख कोटी माफ,  मग शेतकऱ्यांना २ लाखांची कर्जमाफी का नाही?

अदानी-अंबानींचे २० लाख कोटी माफ,  मग शेतकऱ्यांना २ लाखांची कर्जमाफी का नाही?

by प्रतिनिधी
0 comments
Farmers' mass protest march in Sambhajinagar

जमीर काझी : मुंबई : राज्यात शेतकरी यावर्षी दुष्काळाच्या हालअपेष्टा सहन करत असून संकट खूप मोठे आहे .पण त्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या वेदनेचा आवाज भाजपा महायुती सरकारच्या कानावर पडत नाही. अदानी-अंबानीचे २० लाख कोटीचे कर्ज माफ केले जाते पण शेतकऱ्यांचे २ लाख रुपये कर्जमाफ करण्यास सरकारला काय होते? असा संतप्त प्रश्न महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी बुधवारी विचारला. (Farmers’ mass protest march in Sambhajinagar)

छत्रपती संभाजी नगरमध्ये डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी जनआक्रोश दुष्काळ मोर्चा काढण्यात आला. यावेळी झालेल्या सांगता सभेत ते बोलत होते. मोर्चात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खा. डॉ. कल्याण काळे, खासदार डॉ.शिवाजीराव काळगे, खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे,  यशपाल भिंगे,  जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद अक्रम यांच्यासह मराठवाड्यीतील सर्व जिल्हा काँग्रेस कमिट्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.

मुंबई, दिल्लीत आंधळं,मुकं, बहिरं सरकार

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करत असताना सुलतानी संकटाशीही त्याला दोन हात करावे लागत आहेत. यावर्षी खरिप पुर्णपणे वाया गेला, पेरलेले हाती लागणार नाही, आता बघायचे कोणाकडे. मायबाप सरकार भरीव मदत करेल ही अपेक्षा शेतकरी बाळगून आहे. पण मुंबई व दिल्लीत आंधळं, मुकं व बहिरं सरकार बसलेले आहे. (Farmers’ mass protest march in Sambhajinagar)

लबाड लांडगं ढोंग करतंय,कर्जमाफी केल्याचं सोंग करतंय,

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिवाळीसाठी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा प्रकार असून दुष्काळात होरपळत असलेल्या बळीराजाची क्रर थट्टा आहे, अशी टीका करून ते  म्हणाले की, ‘निवडणुकीत वाटण्यासाठी आमदार-खासदार खरेदी करण्यासाठी  महायुतीकडे प्रचंड पैसा आहे, उद्योगपतींसाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे, लबाड लांडगं ढोंग करतंय कर्जमाफी केल्याचं सोंग करतंय, अशी आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची ही वेळ आहे, राजकारण करण्याची नाही. शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख रुपये अनुदान सरसकट द्या, अशी मागणी केली.

राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला

ज्येष्ठ नेते  बाळासाहेब थोरात  म्हणाले की, ‘मराठवाड्यातील स्थिती तर अत्यंत वाईट आहे. शेतकऱ्यांबरोबर शेतमजूरही संकटात आहे. चारा-पाण्याची परिस्थिती कठीण आहे. पिण्याचे पाणी नाही. सरकार शेतकरी, शेतमजूर व पशुधनाचा विचार करत नाही. दिवाळीसाठी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय म्हणजे ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, असा टोला त्यांनी लगावला. (Farmers’ mass protest march in Sambhajinagar)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!