नवी दिल्ली : भारतीय महिला रिले संघाने ४x१०० मीटर रिले स्पर्धेत नागोवा अशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. मैदानी स्पर्धेतील हे भारताचे पहिले सुवर्ण आहे. किरण पहल, पूवम्मा मचेत्तिरा, प्राची आणि विथ्या रामराज यांनी सुवर्ण पदक भारताकडे खेचून आले. बहरीनच्या संघाला रौप्य तर चीनला ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघांने ३.२९.६९ इतकी वेळ दिली. (Indian women’s relay team wins gold )
भारताची सुरुवात संथ झाली. पहिल्या टप्प्यातील ४०० मीटरमध्ये धावणाऱ्या किरणने तिसऱ्या स्थानावर असताना पूवम्माकडे बॅटन सोपवले. पूर्वम्माने वेग वाढवत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर प्राचीने तिसऱ्या फेरीत आपली धाव कायम ठेवली. शेवटच्या राऊडमध्ये विथ्या रामराजने बहरीनच्या सलवा ईद नासेरचा पाठलाग करत विध्या आणि तिच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. पण विध्याने वेगवान कायम ठेवत भारताच्या सुवर्णपदकावर नाव कोरले. (Indian women’s relay team wins gold )
भारताच्या पूजा सिंगनेही लांब उडीत भारताला ब्राँझ पदक मिळवून दिले. तिथे १.८४ मीटरची उडी मारली. १९ वर्षीय पूजाने आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न केला पण तिला यश आले नाही. १.८७ मीटरची उडी तिला मारता आली नाही. त्यामुळे तिला ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले. उझबेकिस्तानच्या सैफुल्लायेवाने सुवर्ण पदक पटकावले तर कझाकिस्तानच्या क्रिस्टिना ओव्हचिनिकोवाने रौप्य पदक पटकावले.
५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या गुलवीर सिंगने ब्राँझ पदक पटकावले. यापूर्वी गुलवीरसिंगने १५०० मीटर आणि १० हजार मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले आहे. त्याचे हे तिसरे पदक आहे. मैदानी स्पर्धेत तीन पदके जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे तर देशातील चौथा खेळाडू आहे. यापूर्वी लॅव्ही पिटोने १९५१ मध्ये तीन पदके, पी.टी. उषाने सेऊल १९८६ मध्ये चार पदके तर बुसान २००२ स्पर्धेत के.एम.बीनामोलने तीन पदके जिंकली आहेत.
४x४०० मीटर पुरुषांच्या रिले शर्यतीत भारताने ब्राँझ पदक मिळवले. धर्मवीर चौधरी, मनु थेक्कीनलिल, विशाल थेन्नारासु आणि जय कुमार यांनी ३ मिनिटे १.६१ सेंकद इतकी वेळ दिली. जपानने सुवर्ण तर कतारने ब्राँझ पदक पटकावले. (Indian women’s relay team wins gold )