नवी दिल्ली : प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्तीबद्दल त्यांचे सहकारी निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ने प्रसिद्धीस दिले आहे. गेल्या दहा महिन्यात ज्ञानेशकुमार यांच्या निर्णयाविरोधात संधू आणि जोशी या आयुक्तांनी १४ वेळा आक्षेप नोंदवले आहेत. या वृत्ताने खळबळ उडाली असून विरोधी पक्षाने भाजप एनडीएवर टीकेचा भडिमार सुरू केला आहे.
१३ कोटी मतदारांची नावे वगळली
भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनर्तपासणी (एसआयआर) अंतर्गत देशभर मतदार याद्यांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत निवडणूक आयोगाने ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील मतदार याद्यातून १३ कोटीहून अधिक नावे वगळली आहेत. मतदानाचा हक्क कोणाला मिळणार आणि कोणाला नाही यावरुन निवडणूक आयुक्तांच्या तीव्र मतभेद सामोरे आले आहेत. (Objections raised regarding ECI Gyanesh Kumar’s working style)
निवडणुक आयोगात फाटाफूट
एसआयआरची अंमलबजावणी तीनही आयुक्तांच्या देखरेखी सुरू झाली आहे. पण गेल्या दहा महिन्यात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार किमान १४ वेळा परस्पर निर्णय घेतले आहेत. त्याला निवडणूक आयुक्त संधी आणि निवडणूक जोशी यांनी लेखी आक्षेप नोंदवले आहेत. नवीन मतदार जोडणे आणि नावे वगळणे यासह विविध टप्प्यांबद्दल आपल्याला अंधारात ठेवल्याची तक्रार संधू आणि जोशी यांनी केली आहे. मतदार सॉफ्टवेअरच्या विश्वासार्हतेबद्दल दोन्ही आयुक्तांनी कॅबिनेट सचिवाकडे दाद मागतिली आहे. निवडणूक आयोगातही या फुटीमुळे कामाकाजांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतून नावे वगळणे, पुन्हा समाविष्ठ करणे, एसआयआर प्रक्रियेत मतदारांची नावे पुन्हा समाविष्ठ करणाऱ्या आदेशांविरोधात अपील दाखल करणे, संपूर्ण मतदार यादीच्या सुरक्षिततेची जबाबदारी या आक्षेपांना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमाराला पाठवण्यात आल्या आहेत. (Objections raised regarding ECI Gyanesh Kumar’s working style)
ज्ञानेशकुमारांच्या कार्यपद्धतीवर एकाच दिवशी चार आक्षेप
निवडणूक आयुक्त संधी यांनी लेखी तक्रारीत असे म्हटले आहे की निवडणूक आयोगाने दोन आयुक्तांच्या लेखी सल्ल्याविरुद्ध कारवाई केली. आणि त्यांची ही कृती अनाधिकृत आणि बेकायदेशीर होती अशी तक्रार केली आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये निवडणूक आयुक्त संधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे पहिली लेखी तक्रार केली होती. १६ एप्रिल २०२६ रोजी निवडणूक आयुक्त संधू आणि जोशी यांनी प्रत्येकी दोन अशा चार तक्रारी एकाच दिवशी केल्या आहेत. आयटी मॉड्यूल, पोर्टल, डाटा बेस, फॉरेन ट्रीप यावर आक्षेप घेण्यात आले. (Objections raised regarding ECI Gyanesh Kumar’s working style)