Home » Blog » विलिनीकरण आणि एनडीएसोबत जाणारी चर्चा शरद पवारांनी फेटाळली

विलिनीकरण आणि एनडीएसोबत जाणारी चर्चा शरद पवारांनी फेटाळली

by प्रतिनिधी
0 comments
Pawar dismissed talk of a party merger

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी राष्ट्रवादीचे विलीनीकरण आणि एनडीएसोबत जाणाऱ्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांची मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे  बैठक झाली. त्याला पक्षाच सर्व खासदार, आमदार प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. (Pawar dismissed talk of a party merger)

आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत

शरद पवार म्हणाले, आम्ही कुठेही आणि कोणासोबतही जाणार नाही. ज्यांना जायचं असेल त्यांनी आमच्यासोबत यावं. विलिनीकरणाच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला असून आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिले. आम्ही कोणत्याही पक्षात विलिन होणार नाही. आमचा पक्ष मजबूत करण्यावर भर असलेल असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात राज्यात महाविकास आघाडी आणि देशपातळीवर इंडिया आघाडीसोबत काम करणाऱ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Pawar dismissed talk of a party merger)

राष्ट्रवादी पक्ष रस्त्यांवर उतरुन संघर्ष करणार

राज्यात शेतकऱ्यांची अत्यंत भयावह अवस्था आहे. सरकारने जाहीर केलेल्या सवलती अपूर्ण असून त्यांना पूर्ण सवलती द्याव्यात, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू ,असे इशारा त्यांनी दिला. शरद पवार यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढवला निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप व्यक्त करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाबाबत मुद्दा निकालात काढताना पक्ष बळकटीला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले,’राज्यातील दुष्काळी परिस्थिती बाबत आम्ही अडीच तास एकत्र बसलो आहोत. अनेक वेगवेगळ्या मागण्या दुष्काळाचा निमित्ताने ऐकायला मिळाल्या. प्रांताध्यक्ष यांनी सूचना दिल्यानुसार आपण काय निवेदन आंदोलन करताना द्यायच्या आहेत, हे सांगितलं आहे. रविवारी कोअर कमिटी बैठक आम्ही घेतली. राज्य सरकारने  त्याचे निवेदन दिलं आहे. आम्ही दोन- चार दिवसांत सरकारकडे याबाबत आग्रह करू. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करु.

राज्य सरकारने २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. बाकी जिल्हे त्यात नाहीत. केळी पिकाला मदत नाही. याबाबत नोंद घेणे गरजेचे आहे,असे शरद पवार साहेब यांनी बोलताना सांगितले. या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष  खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, विधिमंडळ गटनेते व आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, प्रदेश सरचिटणीस व आमदार रोहित पवार व इतर नेत्यांनी, जाणकारांनी आपले विचार मांडले, तसेच राजेश टोपे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, खा.धैर्यशील मोहिते -पाटील, खासदार निलेश लंके, खा. भास्कर भगरे, आ. राजू खरे, आ. बापूसाहेब पठारे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी खा .वंदना चव्हाण, माजी आमदार सर्वश्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार विद्या चव्हाण, मुंबई अध्यक्ष, माजी आमदार मिलिंद कांबळे, भूषणसिंहराजे होळकर, पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व सेलचे प्रमुख, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपथित होते. (Pawar dismissed talk of a party merger)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!