Home » Blog » तिसंगी महाविद्यालयात म. ह. शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

तिसंगी महाविद्यालयात म. ह. शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

by प्रतिनिधी
0 comments
Various programs at Tisangi College

कोल्हापूर : प्रतिनिधी : तिसंगी (ता. गगनबावडा ) येथील म. ह. शिंदे महाविद्यालयात लोकनेते म. ह. शिंदे यांच्या ३१व्या स्मृतिदिनानिमित्त दि. ३ व ५ ऑक्टोबर, २०२६ रोजी विविध कार्यक्रम व शिवाजी विद्यापीठाची पद्माराजे स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. (Various programs at Tisangi College)

           शनिवार तीन ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुली व मुले यांच्या स्वतंत्र होणाऱ्या मॅरेथॉन या स्पर्धेसाठी २००१, १५०१, १००१, ५०१ रुपये गुणानुक्रमे पारितोषिक आहे. यासाठी प्रा.ए. डी.पिंजरकर (९३०७८०९७९२) यांच्याशी संपर्क साधावा. रांगोळी, चित्रकला या स्पर्धा लहान व मोठ्या गटांमध्ये होणार आहे. यासाठीचे पारितोषिक  १५०१, १००१, ७०१, ५०१असे असून रांगोळी स्पर्धेसाठी  डॉ. श्रीमती एस. के. मेंगाणे ( ८२७५३५९९९३) तर चित्रकला स्पर्धेसाठी प्रा. एस. एल. पवार (८४२११५५९७०)यांच्याशी संपर्क करावा. (Various programs at Tisangi College)

सोमवारी ५ ऑक्टोबर रोजी म.ह.शिंदे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम व शिवाजी विद्यापीठाच्या वतीने पद्माराजे स्मृती व्याख्यानमाला होणार आहे. सकाळी दहा वाजता ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  पी. जी. शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी संस्थेचे  सचिव स्वप्नील शिंदे,खजिनदार बंडोपंत पाटील, संचालक आनंदा पाटील, लहू गुरव,भगवान पाटील, अरुणकुमार पाटील, सर्जेराव शिंदे,पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ शिंदे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य नंदकुमार पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी मॅरेथॉन, रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती प्रसिद्धीपत्रिकाद्वारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पोंदे यांनी दिली आहे. (Various programs at Tisangi College)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!