नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिकेचा सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. पुढील आठवड्यात यावर सुनावणी होणार आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. (Petition filed in the Supreme Court against Gyanesh Kumar)
सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख खंडपीठाकडे राकेशकुमार यांनी याचिका दाखल केली आहे. आज सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर राकेशकुमार यांच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ज्ञ विकास सिंग यांनी या प्रकरणांवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली. ज्ञानेश कुमार यांची कार्यपद्धती आणि एसआयआर प्रक्रियेला बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी याचिकेत केली आहे. ज्येष्ठ विधीज्ज्ञ विकास सिंग म्हणाले, बहुसदस्यीय आयोग स्थापन करण्यामागचा उददेश हाच होता आणि कायद्यातही तसे नमूद करण्यात आले आहे की कोणताही निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतला जावा. आता निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने काम केले आहे त्यावरुन एसआयआर या संपूर्ण प्रक्रियेत निवडणूक आयोगाचा निर्णय खरोखरच होता का याबाबत गंभीर शंका निर्माण होते. या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी अशी विनंती सिंग यांनी केल्यानंतर सरन्यायाधीशांची हे प्रकरण पुढील आठवड्यात सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्याचे आदेश दिले. (Petition filed in the Supreme Court against Gyanesh Kumar)