Home » Blog » Athletics : आशियाई ‘ॲथलेटिक्स’साठी भारतीय संघ जाहीर

Athletics : आशियाई ‘ॲथलेटिक्स’साठी भारतीय संघ जाहीर

ऑलिपिंक सुवर्णपदकविजेत्या नीरजचे नाव नाही

by प्रतिनिधी
0 comments
Athletics

नवी दिल्ली : पुढील महिन्यात दक्षिण कोरियामध्ये रंगणाऱ्या आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी ५९ खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. दोन ऑलिंपिक पदके जिंकणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राचा या स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. (Athletics)

दक्षिण कोरियातील गुमी येथे २७ मे ते २ जूनदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष बहादूर सिंग सागू यांनी हा संघ जाहीर केला. नीरज हा २४ मेपासून बेंगळुरूमध्ये सुरू होणाऱ्या नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेत सहभागी होणार असल्याने त्याला संघातून वगळण्यात आले. त्याचप्रमाणे, आशियाई सुवर्णपदक विजेता आणि माजी आशियाई विक्रमवीर गोळाफेकपटू ताजिंदरपाल तूर हा दुखापतीतून सावरत असल्याने त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी थायलंड येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये भारताने ६ सुवर्णांसह एकूण २७ पदके कमावून गुणतक्त्यात तिसरे स्थान पटकावले होते. (Athletics)

संघ : पुरुष अनिमेश कुजुर (२०० मी.), अनु कुमार, क्रिशन कुमार (८०० मी.), युनूस शाह (१,५०० मी.), अविनाश साबळे (३,००० मी. अडथळा), गुलवीर सिंग, अभिषेक पाल (५,००० मी.), गुलवीर सिंग, सेवान बरवाल (१०,००० मी.), प्रवीण चित्रावेल, अब्दुल्ला अबुबकर (तिहेरी उडी), सर्वेश कुशारे (उंच उडी), सचिन यादव, यशवीर सिंह (भालाफेक), समरदीप सिंह (गोळाफेक), तेजस्वीन शंकर (डेकाथेलॉन), सर्विन सेबॅस्टियन, अमित (२० किमी. चालणे), प्रवीण प्रमोद, अनिमेश कुजुर, मणिकांत होब्लिधर, अल्मान बोर्गोहेन, तमिलारासू, रगुल कुमार, गुरिंदरवीर सिंग (४ बाद १०० मी. रिले), विशाल टीके, जय कुमार, मनू टीएस, धर्मवीर चौधरी, रिन्स जोसेफ, तुषार कांती, संतोष कुमार, मोहित कुमार (४ बाय ४०० मी. रिले).

महिला – नित्या गंधे (२०० मी.), रुपल चौधरी, विथ्या रामराज (४०० मी.), ट्विंकल चौधरी, पूजा (८०० मी.), लिली दास, पूजा (१,५०० मी.), पारुल चौधरी, अंकिता (३,००० मी. अडथळा), संजीवनी बाबुराव, पारुल चौधरी (५,००० मी.), संजीवनी बाबुराव, सीमा (१०,००० मी.), ज्योती याराजी (१०० मी. अडथळा), विथ्या रामराज, अनू आर. (४०० मी. अडथळा), शैली सिंह, ॲन्सी सोजन (लांब उडी), नंदिनी अगसारा (हेप्टेथेलॉन), नित्या गंधे, अभिनया राजराजन, स्नेहा एस. श्रावणी नंदा, ज्ञानेश्वरी, व्ही. सुदिक्षा (४ बाद १०० मी. रिले), रुपल, स्नेहा के. शुभा वेंकटेसन, जिश्ना मॅथ्यू, कुंजा रजिता, सँड्रामोल साबू (४ बाय ४०० मी. रिले).
हेही वाचा :
एकाच मैदानावर कोहलीची सर्वाधिक अर्धशतके
वैभव सूर्यवंशीला सेहवागचा कडक सल्ला

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00