Home » Blog » मिश्र स्कीटमध्ये नारुका-धालीवाल जोडीला ब्राँझ

मिश्र स्कीटमध्ये नारुका-धालीवाल जोडीला ब्राँझ

by प्रतिनिधी
0 comments
Bronze for Naruka-Dhaliwal pair in mixed skeet

नवी दिल्ली : प्रतिनिधी : अशियाई क्रीडा स्पर्धेत शूटिंगमधील मिश्र स्किट सांघिक प्रकारात भारताच्या अनंतजीतसिंग नरुका आणि परिनाझ धालीवाल या जोडीने ब्राँझ पदक पटकावले. चीनच्या जोडीने सुवर्ण तर दक्षिण कोरिया जोडीने रौप्य पदक पटकावले. (Bronze for Naruka-Dhaliwal pair in mixed skeet)

१५० शॉटमधून १३८ गुण मिळवून नरुका आणि धालीवाल जोडीने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. पात्रता फेरीत कतार १४५ गुणांसह अव्वल स्थानी होता. त्या खालोखाल दक्षिण कोरिया आणि चीन तिसऱ्या स्थानी होते. भारत चौथ्या स्थानी होता.

अंतिम फेरीत नारुका धालीवाल जोडीने अचूक निशाना साधत पहिल्या तीन क्रमांकाकडे वाटचाल केली. सहा फेरीनंतर भारत आणि कोरिया याचे ४४ गुण समान झाले. पण पात्रता फेरीतील क्रमवारी लक्षात घेतल्याने कोरिया अंतिम फेरीत पोचला. भारताने ४४ गुण मिळवत ब्राँझ पदक पटकावले. सात फेरीनंतर चीनने ५२ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले तर ५१ गुण मिळवत रौप्य पदक मिळवले. पात्रता फेरीत पहिल्या स्थानी असलेल्या कतार संघ १८ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. (Bronze for Naruka-Dhaliwal pair in mixed skeet)

काल महिला गटात भारताने स्कीटमध्ये ब्राँझ पदक पटकावले. यासंघात परिनाझ धारीवाल सह रायझा ढिल्लन, महेश्वरी चौहान भारतीय संघात होती. आजच्या पदकाने स्कीट प्रकारात भारतीय पदकांची संख्या तीन झाली आहे. (Bronze for Naruka-Dhaliwal pair in mixed skeet)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!