Russian Cancer Vaccine : रशियाने बनवली कॅन्सरवरील लस

महाराष्ट्र दिनमान : कर्करोगाची दहशत जगभरात आहे. आरोग्यविज्ञान प्रगत झाले तरी कर्करोगावरील उपचाराच्या मर्यादा वेळोवेळी स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे जगभरात कर्करोगाचे मोठे आव्हान मानले जाते. कर्करोगामुळे हजारो लोकांचे बळी जातात. या पार्श्वभूमीवर रशियामधून एक गुड न्यूज आली असून कर्करोगावरील लस विकसित केल्याचा दावा रशियाच्या आरोग्य विभागाने केला आहे. २०२५च्या सुरुवातीला म्हणजे पुढील महिन्यात ही लस बाजारात येणार असून आणि रशियातील कर्करोग रुग्णांना (Cancer Patient) ती मोफत दिली जाणार आहे. (Russian Cancer Vaccine)

TASS या रशियन सरकारी न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार अनेक संशोधन केंद्रांच्या मदतीने ही लस विकसित केली गेली आहे. ही लस कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार आहे. ही लस ट्यूमर तयार होण्यापासून रोखण्यासाठी म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही लस सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध केली जाणार नाही, असेही रशियाने स्पष्ट केले आहे. स्पष्टपणे आणि सोप्या भाषेत सांगायचे तर, या लसीचा उपयोग फक्त उपचारासाठी (Treatment) केला जाईल, प्रतिबंधासाठी (Prevention) नाही. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटर (RMRC) चे प्रमुख आंद्रेई काप्रिन यांनी सांगितले की, ही लस २०२५ च्या सुरुवातीला उपलब्ध होईल.

यापूर्वी, गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी (GNRCEM) चे संचालक अलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी सांगितले की, ही लस ट्यूमरच्या विकासाला आणि संभाव्य मेटास्टेसिसला आळा घालते, असे लसीच्या प्री-क्लिनिकल चाचण्यांमध्ये आढळले आहे.
रशियाकडून या लसीसंदर्भात काही गोष्टी स्पष्ट केल्या असल्या तरी अनेक गोष्टींबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. या लसीचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही. तसेच, ही लस कोणत्या प्रकारच्या कर्करोगाच्या उपचारासाठी तयार केली आहे, ती किती प्रभावी आहे किंवा या लशीची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे, याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.

ही लस mRNA तंत्रज्ञानावर आधारित आहे. म्हणजेच, या लसीच्या मदतीने मानवी पेशींना जेनेटिक सूचना दिल्या जातात. ज्यामुळे त्या व्हायरसशी लढण्यासाठी प्रोटीन तयार करतात.

जगाच्या इतर भागांप्रमाणेच रशियामध्येही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. २०२२ च्या एका अहवालानुसार, रशियामध्ये सहा लाख ३५ हजारांहून अधिक कर्करोगाचे नवीन रुग्ण आढळले होते. अलीकडच्या काळात रशिया वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने प्रगती करत असल्याचे आढळून येते. यापूर्वी, कोविडकाळात रशियाने कोविड-19 साठी स्वतःची ‘स्पुतनिक व्ही’ लस तयार केली होती. ही लस अनेक देशांना विकली देखील होती

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले