नवी दिल्ली : भारतीय नेमबाजीतील आदरणीय व्यक्तीमत्व असलेले भारतीय नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई नेमबाजी स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचे वयाच्या ४९ निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. (Jaspal Rana passed away)
नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कलिकेश नारायण सिंह देव यांनी राणा यांचे दिल्लीत एका हॉस्पिटलमध्ये निधन झाल्याची माहिती दिली. जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतून ते परतले होते. भारतीय पिस्टल नेमबाजीचे ते प्रशिक्षक होते. स्पर्धेतून परतल्यानंतर ते आजारी पडले. नवी दिल्ली परत येतानाच विमानात जसपाल राणा यांची प्रकृती बिघडली. त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये त्यांच्या वैद्यकीय चाचण्याच्या घेण्यात आल्या. डॉक्टरांनी त्यांच्यावर स्टेंट शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. पण आजारातून ते बरे होऊ शकले नाहीत. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. (Jaspal Rana passed away)
जसपाल राणांनी यांनी शूटिंगमध्ये आपली ठळक कामगिरी राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय पातळीवर उमटवली होती. २०१२ मध्ये ज्युनिअर राष्ट्रीय पिस्टल प्रशिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्याच प्रशिक्षणाखाली सौरभ चौधरी, अनिश भानवाला आणि चिंकी यादव हे खेळाडू घडले. पॅरिस ऑलिपिंक दोन ब्राँझ पदक पटकावलेल्या मनू भाकरचे ते प्रशिक्षक होते. भारतीय नेमबाजी क्षेत्रातील योगदानाबद्दल सरकारने राणा यांना २०२० मध्ये प्रतिष्ठेच्या द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान केला होता. पद्मश्री पुरस्कारानेही राणा यांचा गौरव करण्यात आला होता.
जयपाल राणा यांनी राष्ट्रकुल, अशिया आशियाई आणि जागतिक विश्चषक स्पर्धेत भारताकडून प्रतिनिधीत्व केले होते. १९९६ मध्ये ज्युनिअर विशचषक शूटिंग स्पर्धेत त्यांनी पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. १९९४ मध्ये त्यांनी अशियाई स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक पटकावले. (Jaspal Rana passed away)