black moon: ‘ब्लॅक मून’ची अनुभूती मिळणार

black moon

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अवकाश निरीक्षणाची आवड असणाऱ्यांसाठी तसेच खगोलप्रेमींसाठी यावर्षीचा ३१ डिसेंबर खास ठरणार आहे. या दिवशी अवकाशात एक वेगळा नजारा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. यादिवशी ‘ब्लॅक मून’ म्हणजेच ‘काळा चंद्र’ दिसणार आहे. ही एक दुर्मिळ खगोलीय घटना समजली जाते. खगोलवैज्ञानिक त्याला ‘ब्लॅक मून’ असे म्हणतात. (black moon)

चंद्र जेव्हा पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत येतो तेव्हा तो दिसत नाही. त्यामुळे त्याला ‘काळा चंद्र’ असे म्हटले जाते. त्याला ‘ब्लॅक मून’ असेही म्हटले जाते. यावेळी चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो. सूर्यप्रकाशाने उजळणारा चंद्राचा भाग आपल्या नजरेच्या टप्प्यात येत नाही. एका महिन्यात दोनदा अमावस्या येते त्यादरम्यान ‘ब्लॅक मून’सारखी घटना होते. अशी घटना खूप कमी वेळेला अनुभवता येते. खगोलशास्त्रात ती दुर्मिळ आणि खास म्हणून ओळखली जाते.(black moon)

ब्लॅक मून कधी दिसणार?

युनायटेड स्टेट्स नेवल ऑब्झर्वेटरीनुसार, युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये ३१ डिसेंबरला ब्लॅक मून दिसेल. भारतात ही घटना रात्री पाहता येणार आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मतानुसार ३१ डिसेंबरला पहाटे ३.५७ च्या सुमारास हा चंद्र दिसेल.

जगभर उत्सुकता

खगोलप्रेमींसाठी ही घटना दुर्मिळ आणि खूपच औत्सुक्याची असते. त्यामुळे ही घटना अनुभवण्याची उत्सुकता जगभर आहे. ती पाहण्यासाठी खगोलप्रेमींनी आवश्यक ती तयारी केली आहे. सोशल मीडियावरही त्यासंबंधी जोरात चर्चा आहे.

हेही वाचा :
मंगळ दहा हजारपटीने चमकणार

Related posts

Beed sirpanch: डॉक्टरच्या माहितीवरून काढला घुले, सांगळेचा माग

India stats : बुमराहचा विक्रम; पंतचे दुसरे वेगवान अर्धशतक

Explosion: फटाका कारखान्यात सहा कामगार होरपळले