वक्फबाबत चुकीची माहिती दिल्याने भाजप खासदारावर गुन्हा दाखल

BJP MLA

बेंगळुरू  वृत्तसंस्था : कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या जमिनीची मालकी वक्फ बोर्डाने घेतल्याचा दावा केल्या प्रकरणी भाजप खासदार (BJP MLA) तेजस्वी सूर्या यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

BJP MLA :  तेजस्वी सूर्या यांच्यावर गुन्हा दाखल 

वक्फ बोर्डाने एका शेतकऱ्याची जमीन हडपली. त्यामुळे त्याने जीवन संपवले, अशी माहिती भाजप खासदार तेजस्वी सूर्या आणि दोन कन्नड न्यूज पोर्टलच्या संपादकांनी शेअर केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार सूर्या यांनी त्यांच्या ‘एक्स’वरील हटवलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते, की कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील रुद्रप्पा चन्नाप्पा बालिकाई या शेतकऱ्याची जमीन वक्फ बोर्डाने कर्जाचा ‘हप्ता’ न दिल्याने घेतली. त्यामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केली. सूर्या यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मंत्री बीझेड जमीर अहमद खान यांच्यावर ‘आपत्तीजनक परिणाम’ द्वारे राज्यातील शेतकऱ्यांवर संकट ओढवल्याचा आरोपही ट्विटमधून केला होता.

हावेरी पोलिस अधीक्षकांनी जानेवारी २०२२ मध्ये झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या जमिनीच्या मालकीच्या प्रश्नांऐवजी कर्जाचा बोजा आणि पिकाच्या नुकसानीमुळे झाल्याचे स्पष्ट केल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितले, की अनैसर्गिक मृत्यूच्या तपासाच्या प्रक्रियेशी संबंधित असलेल्या कलम १७४ सीआरपीसी अंतर्गत अंतिम अहवाल सादर केल्यानंतर हे प्रकरण आधीच बंद करण्यात आले होते. कन्नड दुनिया ई-पेपर आणि कन्नड न्यूज ई-पेपरच्या संपादकांनादेखील त्याच्या वक्फ जमिनीच्या नोंदीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या असल्याचे सूचित करणारी मथळा प्रकाशित केल्याबद्दल आरोपांचा सामना करावा लागला आहे. हावेरी येथील शेतकरी वक्फ नोटिसीला विरोध करत होते, त्यामुळे रुद्रप्पा यांना मानसिक त्रास होत असल्याचा आरोप या वृत्तात करण्यात आला होता.

हेही वाचा 

Related posts

pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव