अस्ताना (कझाकस्तान) : बाकूहून ग्रोझनीला जाणारे अझरबैजान एअरलाइन्सचे प्रवासी विमान बुधवारी कझाकस्तानच्या अकताऊ विमानतळाजवळ कोसळले. विमानाने आपत्कालीन लँडिंगची विनंती केली. मात्र काही क्षणांतच ते कोसळले. कझाकस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या विमान दुर्घटनेत ४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. (plane crash)
कझाकच्या परिवहन मंत्रालयाने सांगितले की, विमानात ६२ प्रवासी आणि पाच कर्मचाऱ्यांसह ६७ जण होते. या अपघातातून २५ जण बचावले असल्याचे सांगण्यात येत आहे. (plane crash)
अझरबैजान एअरलाइन्सने सांगितले की, फ्लाइट क्रमांक J2-8243 एम्ब्रेर १९० या विमानाने बाकूहून रशियाच्या चेचन्याची राजधानी ग्रोझनीसाठी उड्डाण केले होते. परंतु कझाक शहरापासून अंदाजे ३ किमी अंतरावर त्याचे आपत्कालीन लँडिंग करण्याची वेळ आली. तथापि, ते कोसळले. रशियाच्या इंटरफॅक्स वृत्तसंस्थेनुसार, कझाकस्तानमधील अधिकाऱ्यांनी संभाव्य तांत्रिक समस्येसह अन्य कारणांचा तपास सुरू केला आहे. तर
रशियाच्या एव्हिएशन वॉचडॉगने सांगितले की, पक्ष्यांच्या धडकेमुळे वैमानिकाने आपत्कालीन लँडिंगचा पर्याय निवडला, असा प्राथमिक निष्कर्षावरून दिसते. कझाकस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ग्रोझनीमध्ये दाट धुक्यामुळे विमान अकताऊकडे वळवण्यात आले होते. अझरबैजान एअरलाइन्सच्या या विमानाने अपघातापूर्वी विमानतळावर अनेकदा घिरट्या घातल्या होत्या.
हेही वाचा :
लष्कराचे वाहन दरीत कोसळून पाच जवांनाचा मृत्यू
युक्रेनवर रशियाचा सर्वांत मोठा हल्ला
BREAKING: Azerbaijan Airlines flight traveling from Baku to Grozny crashes in Aktau, Kazakhstan, after reportedly requesting an emergency landing pic.twitter.com/hB5toqEFe2
— RT (@RT_com) December 25, 2024