अयोध्या : अयोध्येतील यंदाचा दीपोत्सव विशेष महत्त्वाचा ठरला आहे. केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून शहराला नवी ओळख देणारे २८ लाख दिवे येथे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दीपोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून सर्वांचे लक्ष या अद्भुत मुहूर्ताकडे लागले आहे. (Ayodhya)
या वेळचा दीपोत्सव केवळ देशासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा आहे. अयोध्येतील ‘राम की पौरी’वरील दिव्यांच्या सजावटीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सरयू नदीच्या काठावर वसलेले ‘राम की पायडी’ या वेळी खास सजवण्यात आली आहे. यानिमित्त सर्व ५५ घाटांवर दिव्यांची सजावट करण्यात आली असून, सुमारे ३५ लाख दिव्यांची रोषणाई होण्याची शक्यता आहे. या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली दीपोत्सव अधिक भव्य करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. योगी सरकारच्या सूचनेनुसार माहिती विभागाने संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था केली आहे, जेणेकरून लोकांना या महान उत्सवाचा घरी बसून आनंद घेता येईल.
अयोध्येतील प्रत्येक रस्ता, प्रत्येक वळण सुंदर फुलांच्या तारांनी आणि आकर्षक दिव्यांनी सजवले जात आहे. शहरात ठिकठिकाणी एलईडी स्क्रीन आणि व्हॅन लावण्यात आल्या आहेत, जेणे करून लोकांना या भव्य सोहळ्याचा आनंद घेता यावा. एकूण २० ठिकाणी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, १५ ठिकाणी एलईडी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनानेही कडक पावले उचलली आहेत. दीपोत्सवादरम्यान स्वयंसेवक आणि ओळखपत्र नसलेल्या इतर लोकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. कार्यक्रमादरम्यान कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कडेकोट केली आहे. (Ayodhya )
यंदा डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठाचे ३० हजार स्वयंसेवक अयोध्या दीपोत्सवादरम्यान प्रत्येकी एक दीप प्रज्वलित करण्यासाठी सज्ज आहेत. दीपोत्सवात पूर्वीचे विक्रम मोडण्याचे काम हे स्वयंसेवक करणार आहेत. त्यांच्या मेहनतीने आणि उत्साहाने हा कार्यक्रम आणखी भव्य होणार आहे. शरयू नदीच्या घाटांवर दिव्यांच्या सजावटीचे काम पूर्ण झाले आहे. दीपोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो भारतीय संस्कृती, वारसा आणि एकात्मतेचे प्रतीक आहे. हा सण दरवर्षी प्रभू श्रीरामाची पूजा करून अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देतो.
अयोध्येचा दीपोत्सव केवळ श्रद्धेचे प्रतीक नाही, तर तो बंधुता, प्रेम आणि एकतेचा संदेशही देतो. उद्या संध्याकाळी अयोध्येच्या दीपोत्सवाला उपस्थित राहणारे सर्वजण या अद्भुत क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. या कार्यक्रमामुळे केवळ अयोध्येची ओळखच मजबूत होणार नाही, तर संपूर्ण देशात आणि जगात अयोध्येचे नाव उज्वल होईल. यंदाची दिवाळी यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड टीम करणार दिव्यांची मोजणी
यावेळी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची ३० सदस्यीय टीमही अयोध्येत उपस्थित राहणार असून ती घाटावरील दिव्यांची मोजणी करणार आहे. यानिमित्ताने अयोध्येच्या दिव्यांची लखलखता आणि प्रकाश जगभर नवा विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे.
हेही वाचा :