बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये रोहित शर्माला कर्णधार आणि जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अनुभवी आणि युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केल्यामुळे अभिमन्यू इस्वरनला संघात स्थान मिळाले आहे. नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. (AUS vs IND)

दुखापतीमुळे कुलदीपला विश्रांती

भारताचा स्टार फिरकीपटू म्हणून ओळख असलेल्या कुलदीप यादवच्या उजव्या पायाला दुखापत झाल्याने त्याला विश्रांती दिली आहे. त्याचबरोबर भारताचा अष्टपैलू अक्षर पटेलचाही संघात समावेश करण्यात आलेला नाही.

शमीला पुन्हा धक्का

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान तो बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकॉडमीमध्ये सराव करत आहे. परंतु, त्याला आणखी एक दुखापत झाल्याची माहिती कर्णधार रोहित शर्माने दिली होती. यावेळी तो म्हणाला की, पूर्ण तंदरूस्त नसल्यामुळे शमीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करणे कठीण आहे. तो सध्या एनसीए (नॅशनल क्रिकेट अकादमी) येथे डॉक्टर आणि फिजिओच्या देखरेखी खाली आहे. (AUS vs IND)

प्रसिद्ध कृष्णाचे संघात पुनरागमन

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वेगवान गोलंदाजीची धुरा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे आहे. याकडे संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी आहे. त्याच्यासह मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि प्रसिध कृष्णा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर संघात रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना फिरकीपटूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इस्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत