आकर्षक पर्सनॅलिटी

आकर्षक पर्सनॅलिटी कर्षक व्यक्तिमत्व हा परवलीचा शब्द आला. त्यात आजकाल ऑप्टिकल इल्युजन व्यक्तिमत्व  चाचण्या लोकप्रिय आहेत. कारण अशा चाचण्यांच्या माध्यमातून एखाद्याचे लपलेले गुणधर्म प्रकट करण्यास मदत होते. व्यक्तिमत्त्वाबद्दल अशा काही चाचण्या आहेत ज्या तिच्या दिसण्यावर आधारित बरेच काही सांगून जातात.. एखाद्याच्या कपाळाचा आकार असो वा त्याच्या पायाची ठेवण असो, अशा वैशिष्ट्यांमुळे संबंधित व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व अधिक जाणून घेता येऊ शकते. त्याचप्रमाणे, असेही म्हटले जाते की एखाद्याच्या पायाच्या बोटांची ठेवणही त्यांच्याबद्दल बरेच काही सांगू जाते! बोटांचे प्रामुख्याने ग्रीक आणि इजिप्शियन असे दोन प्रकार आहेत. त्याच्या आधारावर एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वातील बारकावे समजून घेता येतात, असे स्पष्ट झाले आहे.

इजिप्शियन बोटे

अशी बोटे असलेल्या लोकांना पर्यटन आवडते. सतत प्रवास करणे, नवनवीन लोकांना भेटणे आणि नव्या संस्कृती आणि गोष्टींबद्दल शिकणे आवडते. व्यक्तिगत आयुष्यात ते एकनिष्ठ, वचनबद्ध आणि अतिशय विश्वासार्ह म्हणून ओळखले जातात. खूप मेहनती असतात. कामाच्या ठिकाणी एखादी समस्या उद्भवली तर त्यांच्याकडे समस्यांचे सर्जनशील उपाय असतात. त्यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणा बनून राहतात. खासगी आयुष्याबद्दल ते खूप सजग असतात. त्याचवेळी त्यांचे बाह्यजगाशीही मैत्रिपूर्ण संबंध ठेवून असतात. त्यामुळे त्यांचे इतरांसोबत सख्य असते.

ग्रीक बोटे

दुसरीकडे, ज्या लोकांच्या पायाची बोटे ग्रीक टाइपची असतात, लोक जीवनात उत्साही असतात. नवनव्या गोष्टी स्वीकारण्यासाठी किंवा पडताळण्याची त्यांना आवड असते. नवनव्या गोष्टी आनंदाने आणि आवेगपूर्ण पद्धतीने करण्याची त्यांना सवय असते. जोखीम घेण्याच्या वृत्तीमुळे त्यांना कधीकधी अडचणीही येऊ शकतात. जीवनाविषयीचा त्यांचा दृष्टिकोन खूपच सकारात्मक असतो. असे लोक अंतर्ज्ञानी असतात. त्यांची आभा इतरांना आकर्षित करते. इतरांच्या कौतुकाला ते नेहमीच पात्र ठरतात. आयुष्यात मोठी स्वप्ने पाहून ती सत्यात उतरवण्यासाठी रिस्क घेण्याची त्यांची वृत्ती असते. नव्या अ‌भूत कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात, त्यामुळेच ते इतरांसाठी प्रेरणादायी असतात. एकूणच, असे लोक आदर्शवादी आणि आशावादी असतात. ते चपळ स्वभावाचे असतात. तथापि, समोरच्या माणसाने सीमा ओलांडल्या तर ते अशा लोकांना आपल्या आयुष्यातून तत्काळ वजा करायलाही मागेपुढे पाहत नाहीत

Related posts

पोटातले ओठावर!

lead in turmeric : तुम्ही वापरताय ती हळद रंग तर नाही ना?

ganga and cancer: गंगेच्या पठाराला कॅन्सरचा घट्ट विळखा!