अग्नी चोप्राची द्विशतकी खेळी

गुजरात : अग्नी चोप्रा काही काळीपासून शानदार कामगिरी करत क्रिकेटचे मैदान गाजवत आहे. मिझोरामकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अग्नी चोप्राने रणजी करंडक स्पर्धेतील प्लेट लीगमध्ये सलग दुसरे द्विशतक झळकावले. अग्नी बॉलिवूडमधील प्रसिद्घ दिग्दर्शक विदू विनोद चोप्रा यांचा मुलगा आहे. अग्नीने मणिपूर विरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात २६९ चेंडूंत  २१८ धावांची खेळी केली. यात त्याने २९ चौकार व १ षटकार लगावला. या मोसमातील अग्नीचे तीन सामन्यांतील तिसरे शतक आहे. (Agni Chopra)

अग्नीने अहमदाबादमध्ये झालेल्या अरुणाचल प्रदेशविरुद्घच्या मागील सामन्यात ११० आणि नाबाद २३८ धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर मिझोरामने हा सामना २६७ धावांनी जिंकला होता. यापूर्वी अग्नीने १९ वर्षांखालील आणि २३ वर्षांखालील स्पर्धांमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधत्व केले आहे.

अग्नीचे प्रशिक्षक खुशप्रीत सिंग यांनी त्याला दुसऱ्या संघासाठी खेळण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे अग्नीने मुंबई संघाची साथ सोडून मिझोरामकडून खेळू लागला. संघ बदलल्यानंतर अग्नी चोप्राने शानदार कामिगिरी करत मैदान गाजवले आहे. त्याने चार रणजी सामन्यांमध्ये १०५, १०१, ११४, १०, १६४, १५, १६६ आणि ९२ धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळे अग्नी त्याच्या पहिल्या चार प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये ४ शतके झळकावणारा पहिला फलंदाज बनला आहे. अशी कामगिरी सर डॉन ब्रॅडमन यांनाही करता आलेली नाही. (Agni Chopra)

हेही वाचा :

Related posts

Pak Series win : पाकचे निर्भेळ यश

Indian women’s win : भारताचा मोठा विजय

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’